शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेकरांना तीन दिवस पाणी नाही!

By admin | Updated: October 15, 2015 02:42 IST

मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी.

अकोला/बाश्रीटाकळी: महान धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने पाणीपुरवठय़ाचे काटेकोरपणे नियोजन करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली असतानाच बुधवारी पहाटे कान्हेरी सरप गावानजिक शहराला पाणीपुरवठा करणारी मनपाची मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली. पाण्याचा दाब प्रचंड असल्याने शेतानजिकच्या नाल्यांना अक्षरश: पूर आल्याचे चित्र ग्रामस्थांना पहावयास मिळाले. हा प्रकार उजेडात आल्यानंतर मनपाच्या जलप्रदाय विभागाने जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, किमान तीन दिवस शहराचा पाणीपुरवठा खंडित राहण्याची शक्यता आहे.महान धरण ते अकोला शहरापर्यंत ९00 मि.मी.व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचे जाळे टाकण्यात आले आहे. बुधवारी पहाटे चार वाजता शहरातील जलकुंभात पाणी पोहोचविण्याची प्रक्रिया सुरू होती. परंतु जलकुंभात उशिराने पाणी पोहोचत असल्याचे महापालिकेच्या जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांच्या लक्षात आले. त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांना शोध घेण्याचे निर्देश दिल्यानंतर सकाळी ६ वाजता कान्हेरी सरप गावानजिक मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याचे उजेडात आले. ९00 मी. मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचा दाब प्रचंड असल्याने शेतानजिकच्या नाल्यांना अक्षरश: पुर आला होता. पहाटे चार वाजतापासून सुरू झालेली गळती जलवाहिनीतील पाणी संपेपर्यंत सुरू होती. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाहून गेल्याचा अंदाज मनपा प्रशासनाने व्यक्त केला आहे.