शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘सायकल चालवा-पर्यावरण वाचवा’ संदेश दिला अकोलेकर सायकलपटूनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 20:45 IST

अकोला : सायक्लोन आय एम ए, बधिरीकरण शास्त्र तज्ञ परिषद शाखा अकोला,  जिल्हाधिकारी कार्यालय अकोला, जिल्हा क्रिडा अधिकारी  कार्यालय आणि युथ होस्टेल  यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल संदर्भात जनजागृती  व्हावी ह्या उद्देशाने आज अँटलस  सायक्लोन सायकल रॅली सोत्साहात संपन्न झाली. विविध स्तरांतील शेकडो  सायकलस्वारांनी सहभाग नोंदवून  समाजाला निरोगी आरोग्याचा मंत्र दिला.

ठळक मुद्दे‘आयएमए’ हॉल पासून झाली सुरूवातवसंत देसाई स्टेडियममधे झाला समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सायक्लोन आय एम ए, बधिरीकरण शास्त्र तज्ञ परिषद शाखा अकोला,  जिल्हाधिकारी कार्यालय अकोला, जिल्हा क्रिडा अधिकारी  कार्यालय आणि युथ होस्टेल  यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल संदर्भात जनजागृती  व्हावी ह्या उद्देशाने आज अँटलस  सायक्लोन सायकल रॅली सोत्साहात संपन्न झाली. विविध स्तरांतील शेकडो  सायकलस्वारांनी सहभाग नोंदवून  समाजाला निरोगी आरोग्याचा मंत्र दिला. आज सकाळी  ठिक ७.३0 वाजता ह्या रॅलीला प्रमुख अतिथी आंतरराष्ट्रीय े ट्रायथलॉन डॉ. अमित सर्मथ  यांनी आय एम ए हॉल पासून हिरवी झाडी दाखवून सुरूवात केली. हि रॅली ठरल्यानुसार  गोरक्षण रोड, कौलखेड, जिल्हाधिकारी कार्यालय मागार्ने जाऊन वसंत देसाई स्टेडियम मधे  झाली. स्टेडियम मधील रंगारंग कार्यक्रमात अँटलस सायक्लोन २0१७ चे डायरेक्टर डॉ.  राजेंद्र सोनोने यांनी स्वत:ला आणि येणा-या  पिढींना निरोगी वातावरण देण्यासाठी  झिरो  एमिशन असलेल्या सायकलचा वापर दैनंदिन जीवनात करण्याचे सर्व उपस्थितांना आवाहन  केले. प्रमुख अतिथी डॉ. अमित सर्मथ यांनी येणा-या  काळात आपल्याला जबरदस्तीने  सायकल चालवावी लागेल, आपल्यासमोर दुसरा पर्यायच नसेल, तर मग आजच   सायकलला आनंदाने का नाही स्विकारायचे असा मोलाचा सल्ला सर्वांना दिला. तसेच ५  लक्ष लोकसंख्येच्या  अकोलासारख्या शहरात अश्या रॅली मधे साधारण १0 हजार  नागरीकांचा सहभाग असायला हवा मात्र तो तेवढा नसल्याची खंतही व्यक्त केली.  अकोलेकरांना सायकल ह्या खेळाच्या क्षेत्रात जी काही मदत हवी असेल ती त्यांच्या प्रोहेल्थ  फाऊंडेशन नागपूर तर्फे सहर्ष देण्याचा मानस ही त्यांनी व्यक्त केला. जिल्हा क्रिडा  अधिकारी  गणेश कुळकर्णी यांनी शाळांमधून खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन सतत  प्रयत्न करीत असुन त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत असे सांगितले. आय एम ए चे  अध्यक्ष डॉ. पुरूषोत्तम तायडे यांनी आय एम ए सतत समाजोपयोगी उपक्रम राबवित असून  सायकल रॅली हा त्यातीलच एक भाग असल्याचे सांगितले शारदा एजन्सिजचे मल्होत्रा  यांनी ह्या गरीबांच्या वाहनांवरील १२टक्के जिएसटी सरकारने शुन्य करावा अशी शासनाला   विनंती  केली.   आजच्या रॅलीला विशेष आमंत्रित एक हात आणि पाय अपघातात  गमावलेले तरीही मनात जिद्द बाळगुन विविध शिखरांवर यशस्वी चढाई करणारे अकोट ये थील श्री. धिरज कळसाईत यांनी संपूर्ण रॅली मधे सायकल चालवून समाजासमोर आदर्श  निर्माण केला. त्यांच्या जिद्दीला बघून डॉ.  अंजली  सोनोने यांनी ५ हजार रुपयांचा धनादेश  देवून त्यांना वैयक्तिकरित्या गौरवान्वित केले. आभारप्रदर्शन आय एम ए चे सचिव डॉ.  रणजित देशमुख यांनी केले. सरतेशेवटी भाग्यवंतांचा ड्रॉ प्रमुख अतिथींच्या हस्ते काढण्यात  आला. पुरूष गटात विकास महादेव ठाकरे, महिला गटात कोमल गवारगुरू आणि बालक  गटात नकुल जोशी या भाग्यवंतांना सायकल बक्षिस देण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन  डॉ. प्रविण देशमुख यांनी केले. 

टॅग्स :Akola cityअकोला शहर