अकोला : विदर्भात सूर्य आग ओकत असून, रविवारी अकोल्याचे तापमान ४४ अंशावर पोहोचले होते. यामध्ये वाढ होऊन हे तापमान ४७ अंश डिग्रीपर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. रविवारी अकोल्याचे कमाल तापमान ४४ तर किमान ३३ होते. उद्या सोमवार, २ जून रोजी कमाल ४४, किमान ३३, मंगळवारी कमाल ४६, किमान ३३ तर बुधवार, ३ जून रोजी हे कमाल तापमान ४७ अंश डिग्रीवर जाण्याची शक्यता आहे. किमान तापमान मात्र ३३ अंश असेल.
अकोल्याचा पारा ४४ अंशावर
By admin | Updated: June 1, 2014 22:38 IST