शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे...! अकोल्याचा पारा ४२.८ अंशावर; उकाड्याने अकोलेकर हैराण

By रवी दामोदर | Updated: April 18, 2023 19:23 IST

पाऱ्याचा आलेख दिवसेंदिवस वाढताच असल्याने अकोलेकरांची होरपळ होत आहे. दिवसभर उकाड्याने अकोलेकर हैराण झाले आहेत.

अकोला : आता सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली असून, मंगळवारी (दि. १८) अकोला शहराचे तापमान ४२.८ अंशांवर पोहोचले. पाऱ्याचा आलेख दिवसेंदिवस वाढताच असल्याने अकोलेकरांची होरपळ होत आहे. दिवसभर उकाड्याने अकोलेकर हैराण झाले आहेत. दुसरीकडे, अवकाळी पावसाचा तडाखा सुरूच असल्याने आगामी पाच दिवस पुन्हा अवकाळी पाऊस कोसळण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे.

अकोला शहर कडक उन्हासाठी जगभरात प्रसिद्ध असून, दरवर्षी ऊन नवा उच्चांकावर पोहोचत आहे. त्याचाच प्रत्यय गत दोन-चार दिवसांपासून येत आहे. गत चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्याचे तापमान सातत्याने वाढत असून, पाऱ्याने चाळिशी ओलांडली आहे. मंगळवारी अकोला शहरातील तापमान ४२.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. हे तापमान विदर्भातून अव्वल होते. आगामी दिवसात पुन्हा अवकाळीची शक्यता आहे. परंतु, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात उष्णतेची ही लाट अशीच कायम राहून पारा ४५ अंश सेल्सिअसवर जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

बाजारपेठा सामसूम, रस्त्यावरही वाहतूक नाहीउन्हाचा कडाका वाढल्याने नागरिक दुपारी १२ वाजल्यानंतर बाहेर पडेनासे झाले आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक महत्त्वाची कामे सकाळीच उरकून घेण्यास प्राधान्य देत आहेत. दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाचा कडाका जास्त असल्यामुळे या कालावधीत रस्ते व बाजारपेठा निर्मनुष्य होत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

बुधवारपासून तीन दिवस पुन्हा ‘अवकाळी’चे!प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात दि. १९ एप्रिलपासून तीन दिवस वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे असतानाही पुन्हा अवकाळीची शक्यता वर्तविल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. 

टॅग्स :TemperatureतापमानAkolaअकोला