शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील विधीज्ञांची पंतप्रधानांविरोधात आचारसंहिता भंगची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 18:29 IST

अकोला- लातुर जिल्ह्यातील औसा येथे ९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा घटनेतील शहिदांचा तसेच एअर स्ट्राईकमध्ये सहभागी जवानांच्या नावावर मते मागीतली. सैन्याच्या नावावर राजकारण करण्याचा हा प्रकार असून यामुळे पंतप्रधानांवर आदर्श आचारसंहितेचा भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार अकोल्यातील काही विधीज्ञांनी जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिली.

अकोला- लातुर जिल्ह्यातील औसा येथे ९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा घटनेतील शहिदांचा तसेच एअर स्ट्राईकमध्ये सहभागी जवानांच्या नावावर मते मागीतली. सैन्याच्या नावावर राजकारण करण्याचा हा प्रकार असून यामुळे पंतप्रधानांवर आदर्श आचारसंहितेचा भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार अकोल्यातील काही विधीज्ञांनी जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिली.अकोला जिल्हाधिकारी तसेच निवडणुक निर्णय अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत विधिज्ञांनी नमूद केले आहे की, पंतप्रधान मोदीनी औसा येथिल सभेत मतदारांना त्याचे मतदान पुलवामा घटनेतील शहिदांना समर्पित होऊ शकते का? तुमचे मतदान वालाकोट येथे एअर स्ट्राईक मध्ये सहभागी सैनिकांसाठी समर्पित होऊ शकते का? अशा शब्दात आवाहन केले. भारतीया सैनिकांच्या व शहिद जवानांच्या नावाचा वापर करून राजकारण करण्याच्या या प्रकारामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्यावर प्रचार करण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच यु-टयुब या सोशल मीडीयावर ७ एप्रिल रोजी भाजपा या चॅनलच्या माध्यमातून थीम साँग मध्येही सैनाच्या कारवाईचे फोटो तसेच चित्रफितींचा वापर केला आहे. हासुद्धा आचारसंहितेचा भंग असून यु टयुब वरील भारतीय जनता पार्टी या चॅनलवरही बंदी घालण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. या तक्रारीवर अ‍ॅड.मो.परवेज, अ‍ॅड. प्रवीण पी.देशमुख, अ‍ॅड.मंगेश बोर्डे, अ‍ॅड.राजेश डी.पवार, अ‍ॅड.राजेश जाधव, अ‍ॅड.उदय देशमुख, अ‍ॅड.नंदकिशोर शेळके, अ‍ॅड.काजी हसन अली यांच्या स्वाक्षरी आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदी