शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याच्या  पालकमंत्र्यांनी केली ‘सर्वोपचार’ची पाहणी; रुग्णांच्या समस्या घेतल्या जाणून

By atul.jaiswal | Updated: February 12, 2018 18:50 IST

अकोला : अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सोमवारी येथील   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयाला  भेट देवून वेगवेगळया वॉर्डची  पाहणी केली.

ठळक मुद्देशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयाला  भेट देवून वेगवेगळया वॉर्डची  पाहणी केली. रूग्णालयातील स्वच्छता,  डॉक्टर व कर्मचाऱ्यांची  उपस्थिती याबाबत त्यांनी माहिती जाणून घेत प्रत्यक्ष पाहणी केली.  या ठिकाणी आयोजित जनता आरोग्य दरबारात त्यांनी रुग्णांच्या तक्रारी जाणून घेतल्या.

अकोला : अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सोमवारी येथील   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयाला  भेट देवून वेगवेगळया वॉर्डची  पाहणी केली. तसेच  रूग्णांची विचारपूस करुन त्यांच्या समस्या व अडचणी  जाणून घेतल्या. रूग्णालयातील स्वच्छता,  डॉक्टर व कर्मचाऱ्यांची  उपस्थिती याबाबत त्यांनी माहिती जाणून घेत प्रत्यक्ष पाहणी केली.  रूग्णांना उत्तम आरोग्य सेवा पुरविण्याबरोबरच  रूग्णालयातील सुविधांबाबत वैद्यकीय  अधिकाºयांनी  सजग राहावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. तत्पुर्वी, या ठिकाणी आयोजित जनता आरोग्य दरबारात त्यांनी रुग्णांच्या तक्रारी जाणून घेतल्या.          शासकीय वैद्यकीय  महाविद्यालयात सोमवारी आयोजीत जनता आरोग्य दरबारच्या निमित्याने पालकमंत्र्यांनी रूग्णालयाची पाहणी केली.  यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चौहान, प्रशासकीय अधिकारी संजय देशमुख हे उपस्थित होते. प्रारंभी रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक ६  व ७ मध्ये जावून त्यांनी  रूग्णांची भेट घेतली.  त्यांची सहानुभूतीने विचारपूस करुन त्यांना मिळणाºया आरोग्यसेवेबाबत चौकशी केली. कर्तव्यावर असणारे  डॉक्टर, पारिचारीका व इतर  कर्मचारी यांचीही चौकशी करून  रूग्णांना चांगल्या प्रकारच्या  आरोग्य सुविधा देण्याबरोबरच वॉर्ड व स्वच्छतागृह  स्वच्छ ठेवण्याचे  निर्देश दिले. या  कामांमध्ये दिरंगाई खपवून  घेतली जाणार नाही, अशी तंबी पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. रूग्णालयाच्या परिसरात  सूरू असलेल्या विविध बांधकामांचाही  त्यांनी  याप्रसंगी  आढावा घेतला.  सिटी स्कॅन विभागालाही त्यांनी भेट दिली. 

गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश           यानंतर पालकमंत्र्यांनी स्टोअर रूम, डॉक्टर रूम आणि  विभागप्रमुखांच्या रूमला भेट देवून गैरहजर  असणाऱ्या  डॉक्टर व कर्मचाऱ्यांची  माहिती जाणून घेतली.   विनापरवानगी गैरहजर असणाऱ्यांना  नोटीस  देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

आरोग्य जनता दरबारात दोन तक्रारी          दरम्यान आज झालेल्या जनता  आरोग्य  दरबारात दोन तक्रारी  प्राप्त  झाल्या. प्राप्त तक्रारींचे तातडीने निराकरण  करण्याची  सूचना त्यांनी  संबंधीत अधिका-यांना  केली. यावेळी डॉ. कार्यकर्ते  यांनी महाविदयालय व रूग्णालयाबाबतच्या अडचणी मांडल्या. रुग्णालयात परिचारीका व कर्मचाºयांची  पदभरती, सुपरस्पेशालिटी रूग्णालयात नवीन पदांची निर्मिती याबाबतची माहिती त्यांनी पालकमंत्र्यांना दिली. पदनिर्मितीबाबत लवकरच वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या समवेत  बैठक  घेतली जाईल.  असे यावेळी  पालकमंत्र्यांनी  सांगितले. 

टॅग्स :Akola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयAkola cityअकोला शहर