शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याच्या पालकमंत्र्यांनी घेतला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जनता दरबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 18:31 IST

अकोला: शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जनता आरोग्य दरबारचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देरुग्णांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या दिल्या सूचनाआता महिन्यातून दोन वेळा भरणार आरोग्य जनता दरबारपहिल्या जनता दरबारात तक्रारींचा ओघ कमी

अकोला: शासकीय रुग्णालयांमध्ये सर्वसामान्य रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्याबरोबरच त्यांच्या आरोग्य सेवा विषयक अडचणी तातडीने सोडवण्यासाठी वैद्यकीय अधिकाºयांनी सजग राहावे, अशी सूचना पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सोमवारी येथे केली. शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जनता आरोग्य दरबारचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. आरती कुलवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चौव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम.एम. राठोड आणि अभ्यांगत समितीची सदस्य यावेळी उपस्थित होते.जनता दरबार सुरु होण्यापूर्वी पालकमंत्र्यांनी आरोग्य विभाग व वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाºयांशी चर्चा केली. त्यानंतर नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेण्यात आल्या. यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, उपचाराबाबत रुग्णांच्या नातेवाईकांच्या असणाºया अडचणी सोडविण्यासाठी आता महिन्यातून दोन वेळा जनता आरोग्य दरबार भरवला जाईल. तसेच शासकीय रुग्णालयांतील कामांमध्ये एक सुसूत्रता यावी व रुग्णालयांना भेडसावणाºया अडचणींचे निराकरण करण्यासाठी नियमितपणे आढावा बैठकाही घेतल्या जातील. दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्यमध्ये रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळण्याकरीता तेथील डॉक्टर व कर्मचाºयांची उपस्थितीत नियमितपणे तपासण्यासाठी हे केंद्र जिल्हा आरोग्य कार्यालयाशी संलग्न करण्यात येतील. रुग्णालयांना वेळेवर औषधीसह इतर मुलभूत व पायाभूत सुविधा मिळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडून प्रस्ताव मागविण्यात आला असून त्यावर तातडीने निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री पुढे म्हणाले.आरोग्य सुविधांसाठी देवस्थानांकडे निधीची मागणी करणारमहत्वाच्या आरोग्य सुविधांसाठी शिर्डी सारख्या मोठ्या देवस्थानांकडे निधीची मागणी करण्यात येईल. आरोग्य विभागातील रिक्त पदे थेट मुलाखतीव्दारे भरण्याबाबत संबंधित अधिकाºयांना सूचित करण्यात आले आहे. सध्या अकोला येथील शासकीय रुग्णालयाच्या परिसरात मोठया प्रमाणात इमारतींचे काम सुरु असून लवकरच रुग्णांसाठी नवीन वार्ड उपलब्ध होण्याबरोबरच उपचाराच्या अद्ययावत सुविधाही उपलब्ध होतील, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.जनता दरबारात केवळ आठ तक्रारीझालेल्या पहिल्या जनता आरोग्य दरबारात केवळ आठ तक्रारी प्राप्त झाल्या. तक्रारींची दखल घेऊन त्याचे निरसन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाºयां केल्या.

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय