शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

डासांच्या उद्रेकामुळे अकोलेकर त्रस्त: उपाय निष्फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 14:05 IST

अकोला: तापमानात बदल होताच अकोल्यात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, डासांना त्रासलेल्या अकोलेकरांची रात्रीची झोप उडाली आहे.

अकोला: तापमानात बदल होताच अकोल्यात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, डासांना त्रासलेल्या अकोलेकरांची रात्रीची झोप उडाली आहे. महापालिकेच्या उपाययोजना सर्व निष्फळ ठरत असून, लोकांना डासांच्या बंदोबस्तासाठी अतिरिक्त खर्च करून व्यक्तिगत उपाययोजना करावी लागत आहे. महानगराच्या १२० किलोमीटरच्या परिघात धुराळणी करण्यासाठी महापालिकेकडे केवळ सहा फॉगिंग मशीन उपलब्ध असल्याने ही अवस्था झाली आहे. इतर ३६ फॉगिंग मशीन भंगारात पडल्या असून, मनपा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, अकोल्यात मलेरिया, डेंग्यूसारखे साथीच्या रोगाचा सामना अकोलेकरांना करावा लागत आहे.अकोला शहराची लोकसंख्या सात लाखांच्या घरात पोहोचली असून, अकोला महापालिकेच्या २० प्रभागांचे कार्यक्षेत्र १२० किलोमीटरच्या परिघात विस्तारले आहे. नव्याने महापालिका क्षेत्रात आलेल्या वसाहतींची अवस्था तर त्याहूनही वाईट आहे, तिथपर्यंत महापालिकेची यंत्रणा अद्याप पोहोचली नाही. वर्षात केवळ तीनदा फॉगिंग मशीन पोहोचत असल्याचे समोर आले आहे. विस्तारित २० प्रभागांसाठी अतिरिक्त फॉगिंग मशीनची आवश्यकता असतानाही नाममात्र सहा फॉगिंग मशीनवर कार्यभार उरकला जातो आहे.मनपाच्या नोंदीत एकूण ४२ फॉगिंग मशीन आहेत. यातील ३६ मशीन भंगारात पडून असून, केवळ सहा मशीन सेवा देण्याच्या स्थितीत आहेत. दोन महिन्यांत पेट्रोल डीझलच्या किमती वाढल्याने सहा मशीनही बंद पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या विभागातील कर्मचारी मोठ्या प्रमाणात दिव्यांग असून, अनेकजण सेवानिवृत्त झाले आहे. मनपाच्या मलेरिया विभागात एकूण ३० कर्मचारी कार्यरत असून, औषधे फवारणीसाठी सहा आणि फॉगिंग मशीनची धुराळणी करण्यासाठी २४ कर्मचारी कार्यरत आहेत.उपाय निष्फळमलेरिया विभागाचे प्रमुख डॉ. फारूख शेख यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता, धुराळणी आणि औषधांची फवारणी निष्फळ ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांत पुन्हा डासांची संख्या वाढत असून, कर्मचारी यासाठी कमी पडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरसेवकांचा संताप निरर्थकआमसभेत मनपा नगरसेवकांनी डासांच्या प्रादुर्भावासंदर्भात संताप व्यक्त केला होता. शहरातील डासांमुळे साथीचे रोग वाढले असून, नागरिक महापालिकेवर रोष काढीत आहेत, असे नगरसेवकांनी सभेत निदर्शनास आणून दिले होते. मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी याकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या; मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही.आरोग्य विभागाची डोळेझाकशहरात अनेक खुले भूखंड आहेत, ज्या भूखंडात परिसरातील घाण सांडपाणी साचले आहे. त्यामुळे डासांचा उद्रेक झाला आहे. आरोग्य विभागाने अशा भूखंडधारकांवर आणि सांडपाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करावी; मात्र आरोग्य विभाग याकडे डोळेझाक करीत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका