शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Akola ZP : आघाडीत बैठकीच्या फेऱ्या; भारिप-बमसंला ठाम विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 10:50 IST

महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याबाबत शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप नेत्यांच्या बैठकीमध्ये रात्री उशिरापर्यंतही एकमत होऊ शकले नाही. भारिप-बमसंकडून ठामपणे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात महाविकास आघाडीची मोट बांधण्यासाठी गुरुवारी दिवसभरात शहरातील हॉटेलमध्ये ‘ब्रेक के बाद’ सातत्याने बैठकांच्या फेºया झाल्या, तरीही महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याबाबत शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप नेत्यांच्या बैठकीमध्ये रात्री उशिरापर्यंतही एकमत होऊ शकले नाही. भारिप-बमसंकडून ठामपणे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला आहे. तसेच अध्यक्ष पदासाठी रस्सीखेच असलेल्या नावांबाबत उत्कंठाही शिगेला पोहोचली आहे.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांची महाविकास आघाडी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेची तयारी करीत आहे. त्यासाठी भाजपचे पाठबळ आवश्यक आहे. या चार पक्षांना एकत्र आणून सत्ता स्थापनेचे सूत्र ठरविण्यासाठी स्थानिक नेत्यांनी गुरुवारी दिवसभर बैठका घेतल्या. जिल्हा परिषदेत भारिप-बमसंनंतर दुसºया क्रमांकाची सदस्य संख्या असलेला पक्ष शिवसेना आहे. महाविकास आघाडीत अध्यक्षपद शिवसेनेकडेच जायला हवे, हे नैसर्गिक असताना भारिप-बमसंला सत्तेपासून दूर ठेवताना शिवसेनेच्या ताटातही माती कालवण्याचा प्रकार या बैठकांतील चर्चेमध्ये घडला. सोबतच जिल्हा परिषदेच्या सत्ता पदांची चार पक्षांमध्ये विभागणी करणे, त्यावर त्यांचे समाधान होणे, ही बाब जिकिरीची ठरली आहे. त्यामुळे रात्री ८ वाजतापर्यंत या चारही पक्षांच्या नेत्यांमध्ये तीन बैठका पार पडल्यानंतरही त्यातून ठोस निर्णय पुढे आलेला नव्हता. या बैठकीला चारही पक्षांचे स्थानिक नेते उपस्थित होते.भाजपसोबत सत्ता स्थापनेच्या मुद्यावर कोणतीही चर्चा झालेली नाही. महाविकास आघाडीतील घटकपक्ष शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आहेत. भाजपकडून चर्चेसंदर्भात कोणताही निरोप अद्याप आलेला नाही.- आ. नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख, शिवसेना.भारिपचे सदस्य थेट सभागृहातच पोहोचणार!भारिप-बमसंकडून सत्ता स्थापनेचा ठाम दावा केला जात आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड होईपर्यंत कुणाच्या पाठबळाने सत्ता स्थापन केली जाईल, हे सभागृहातच दिसेल, असा पवित्रा या नेत्यांकडून घेतला जात आहे.अध्यक्ष पदाबाबत उत्कंठाजिल्हा परिषदेत भारिप-बमसंकडून सत्ता स्थापन झाल्यास अध्यक्ष, उपाध्यक्षपदी कोणाची निवड होते, याबाबत जिल्ह्यात उत्कंठा आहे. जिल्ह्यातील दोन मोठ्या समाजगटांमध्ये ही दोन्ही पदे विभागली जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची नावे निश्चित होणार आहेत. नेहमीप्रमाणे ऐनवेळी अर्ज दाखल करतानाच ती उघड होणार आहेत. त्यामुळे अनेकांच्या नावांबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत.शिवसेनेलाही सत्तेपासून दूर ठेवा!भाजपने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद शिवसेना सोडून इतरांना द्यावे, असा पवित्रा घेतला. भारिप-बमसं सोबतच शिवसेनेलाही सत्तेपासून दूर ठेवत असाल, तरच महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याचा पवित्रा भाजपच्या नेत्यांनी घेतल्याची माहिती आहे. भाजपच्या या पवित्र्याने महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या हेतूलाच तडा बसण्याची शक्यता निर्माण झाली.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद