शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Akola ZP Election : महाविकास आघाडीही सत्ता स्थापनेच्या तयारीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 11:50 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका याबाबत काय राहील, यावरच त्या स्थानिक महाविकास आघाडीचा डोलारा उभारला जाण्याची शक्यता आहे. रा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून असलेल्या भारिप-बमसंला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न यावेळीही होऊ शकते. त्यासाठी स्थानिक पातळीवर भाजपला सोबत घेऊन सत्ता काबीज करण्याची तयारी असल्याची माहिती आहे. त्याचवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका याबाबत काय राहील, यावरच त्या स्थानिक महाविकास आघाडीचा डोलारा उभारला जाण्याची शक्यता आहे. राज्यातील सद्यस्थिती पाहता, ही आघाडी कितपत यशस्वी होऊ शकते, हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे. तर समविचारी पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली जाईल, असे भारिप-बमसंने स्पष्ट केले. त्याचवेळी सर्व पर्याय खुले असल्याचेही म्हटले आहे.जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारिप-बमसंला स्वतंत्रपणे सर्वाधिक २३ जागा मिळाल्या आहेत. त्यापाठोपाठ शिवसेनेला १३ जागा आहेत. महाविकास आघाडीचे घटक असलेल्या काँग्रेसकडे ४ तर राष्ट्रवादीकडे ३ जागा आहेत. ही आघाडी अस्तित्वात आल्यास सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या २७ च्या आकड्यासाठी सात सदस्यांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. ती सदस्य संख्या भाजपकडे आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत भारिप-बमसंला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे समीकरण दिसून येते.या चार पक्षांची आघाडी होणार की नाही, ही बाब सध्यातरी अशक्य दिसत आहे. राज्यातील सत्ता स्थापनेनंतर एकमेकांपासून कमालीची दुरावलेली भाजप-सेना जिल्हा परिषदेत एकत्र येईल, याची शक्यता किती, यावर नेतेही चूप आहेत, तर भाजपसोबत असताना काँग्रेस सहभागी होईल, याची शक्यताही तितकीच कमी असल्याचे चित्र सध्यातरी आहे.भारिप-बमसंकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जात आहे. त्यासाठी समविचारी पक्षांना सोबत घेतले जाईल. त्यांच्याशी चर्चा केली जाईल. त्याचवेळी सत्तास्थापनेबाबत सर्वच पर्याय खुले आहेत. सत्ता भारिप-बमसंचीच येईल, असेच प्रयत्न सुरू आहेत. दोन अपक्ष मिळून पक्षाकडे २५ सदस्यसंख्या झाली आहे. त्यामुळे पक्षाला गरज असलेल्या सदस्य संख्येएवढा आकडा निश्चितपणे जुळणार आहे. पदाधिकारी निवडीची तारिख निश्चित झाल्यानंतर या प्रक्रीयेला वेग येणार आहे.अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड १७ रोजी!जिल्हा परिषदेच्या प्रशासक नियुक्ती संदर्भातील आदेश व इतर प्रशासकीय बाबी पाहता येत्या १७ जानेवारी रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. ही तारिख उद्या शुक्रवारी निश्चित होण्याची शक्यता आहे. तर सातही पंचायत समित्यांच्या सभापती पदांच्या आरक्षणाची सोडत १३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती आहे. त्यानंतर प्रथम सभापती निवड करून त्यापुढील काळात अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड प्रक्रीया पूर्ण केली जाणार आहे.

अपक्षांची मनधरणी सुरूदरम्यान, जिल्ह्यात निवडून आलेल्या तीनपैकी दोन अपक्ष उमेदवार भारिप-बमसंच्या कुटुंबातीलच आहेत. पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी त्यांच्या भेटी घेत चर्चा केली. त्यानुसार बोरगाव मंजू येथील निता संदीप गवई, दानापूरच्या दीपमाला दामधर या दोन्ही सदस्या पक्षासोबत असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद