शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

Akola ZP Election : मत विभाजनाचा भाजप-सेनेला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 14:02 IST

सात गटांमध्ये मत विभाजनाचा फटका या दोन्ही पक्षांना बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप-शिवसेना स्वतंत्र लढल्याने या दोन्ही पक्षांचे उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे सर्वच गावांमध्ये त्या उमेदवारांना कमी-अधिक प्रमाणात मतदान झाले. एकगठ्ठा मतांचे विभाजन झाल्याने त्याचा फटका या दोन्ही पक्षांना बसला आहे. जिल्हा परिषदेच्या १४ गटांमध्ये शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यापैकी सात गटांमध्ये भाजपला तिसºया क्रमांकाची मते मिळाली आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या मतांची बेरीज विजयी उमेदवारापेक्षा अधिक आहे. त्यामुळे किमान त्या सात गटांमध्ये मत विभाजनाचा फटका या दोन्ही पक्षांना बसला आहे.जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने सर्व म्हणजे, ५३ गट आणि १०५ गणांत उमेदवार दिले. शिवसेनेनेही कमी-अधिक प्रमाणात सर्वच ठिकाणी उमेदवार दिले.दोन्ही पक्षांची विचारधारा, ध्येय-धोरणे काही प्रमाणात समान आहेत. त्यामुळे त्यांचे मतदारही ठरलेले आहेत. ग्रामीण भागातील मतदारांना एकाच वेळी या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना स्वतंत्रपणे मतदान करण्याची वेळ आली.त्यातून एकगठ्ठा मतांचे विभाजन झाल्याने दोन्ही पक्षांचे उमेदवार अल्पमतात आले. इतर पक्षाच्या उमेदवाराला संधी मिळाली. या दोघांच्या बेरजेपेक्षा कमी मतांच्या संख्येने ते निवडून आले. त्यामध्ये जिल्ह्यातील ५३ पैकी १४ गटांचा समावेश आहे. या गटांमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला दुसºया क्रमांकाची मते मिळाली आहेत. त्यापैकी सात गटांमध्ये स्पर्धेत असलेल्या भाजप उमेदवाराला तिसºया क्रमांकाची मते मिळाली आहेत. दोन पक्षांचा मिळून एकच उमेदवार असता तर या दोन्ही पक्षांना सात जिल्हा परिषद गटांत विजय मिळाला असता, असे अंदाज व्यक्त केले जात आहेत.सेना जिल्हाप्रमुखांचा गटही गेलाशिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या चोंढी गटातून जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व केले होते. यावेळी त्या गटातून त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला रिंगणात उतरविले; मात्र त्यांना आपला गट राखता आला नाही.४त्याचवेळी त्यांच्या गावाचा समावेश असलेला सस्ती गट शिवसेनेच्या उमेदवाराने काबीज केला. चोंढी, विवरा, आलेगाव गटातील लढत त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली होती. त्यापैकी दोन भारिप-बमसंने तर एक काँग्रेसने राखला आहे.दुसºया, तिसºया क्रमांकाची मते मिळालेले गटशिवसेना, भाजपच्या उमेदवाराला दुसºया व तिसºया क्रमांकाची मते मिळालेल्या गटांमध्ये उगवा, बाभूळगाव, आगर, कुरणखेड, चांदुर, चोहोट्टा, माना, दानापूर, भांबेरी, अंदुरा, निमकर्दा, पारस, शिर्ला, चोंढी व विवरा या गटांचा समावेश आहे.

टॅग्स :AkolaअकोलाZP Electionजिल्हा परिषद