शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Akola ZP Election : भारिप-बमसं ठरला सर्वात मोठा पक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 19:03 IST

अकोला : गेल्या विस वर्षापासून जिल्हा परिषदेतील सत्ता ताब्यात ठेवणाऱ्या भारिप-बमसंने यावेळीही ५३ पैकी २३ जागा काबिज केल्या आहेत. ...

ठळक मुद्देभारिप-बमसंने यावेळीही ५३ पैकी २३ जागा काबिज केल्या आहेत.शिवसेनेला जागा ८ वरून १३ जागा मिळाल्या आहेत. भाजपला ११ पैकी ७ जागा टिकण्यातच यश मिळाले आहे.

अकोला : गेल्या विस वर्षापासून जिल्हा परिषदेतील सत्ता ताब्यात ठेवणाऱ्या भारिप-बमसंने यावेळीही ५३ पैकी २३ जागा काबिज केल्या आहेत. दोन अपक्ष पक्षाचे बंडखोर असून ती संख्या २५ वर पोहचणार आहे. सत्तास्थापनेसाठी २७ सदस्यांचे बळ लागणार असून त्यासाठी सर्वात मोठा पक्ष म्हणून भारिप-बमसं दावेदार ठरला आहे. तर शिवसेनेला जागा ८ वरून १३ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला ११ पैकी ७ जागा टिकण्यातच यश मिळाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संख्येत एकने वाढ होऊन ती ७ वर पोहचली आहे.गेल्या पाच वर्षात भारिप-बमसंने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेत सत्ता चालवली. तर शिवसेना, भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत होते. सुरूवातीच्या काळात काँग्रेसला एक सभापतीपद त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सभापती पद देण्यात आले. त्यावेळी भारिप-बमसंला एकुण २१ जागा मिळाल्या होत्या. तर इतर अपक्ष मिळून त्यांची संख्या २३ होती. आता भारिप-बमसंचे २३ सदस्य विजयी झाले. तर दोन अपक्ष या पक्षाचे बंडखोर आहेत. त्यामुळे या पक्षाच्या सदस्यसंख्येत २ ने वाढ झाली आहे. तरभाजपला गेल्या काळात असलेली ११ सदस्यसंख्याही टिकवता आली नाही. या पक्षाच्या ४ जागा घटल्या आहेत. त्याचवेळी शिवसेना गेल्या काळात ८ जागांवर असताना त्या पक्षाला आता १३ जागा मिळाल्या आहेत. त्यांच्या जागांमध्ये ५ ने वाढ झाली आहे. काँग्रेसला ४ तर राष्ट्रवादीला ३ जागा मिळाल्या आहेत. या दोन पक्षाला एक जागा अधिक मिळाली आहे.सत्तेच्या समिकरणात भारिप-बमसंला अवघ्या दोन ते तीन सदस्यांची गरज आहे. त्यासाठी आता कोणाला जवळ केले जाते, हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे. तर शिवसेना-भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून बहुमताचा २७ आकडा गाठता येतो. मात्र, राज्यातील सत्तातरानंतर हे समिकरण जुळणे अशक्य असल्याचे चित्र सध्यातरी आहे.

टॅग्स :Akola ZPअकोला जिल्हा परिषदAkolaअकोलाBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघShiv SenaशिवसेनाZP Electionजिल्हा परिषद