शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

Akola ZP : सभापती पदांच्या निवडीचे भारिपसमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 12:24 IST

सभापतींच्या निवड सभेतही भाजप कोणता पवित्रा घेईल, यावरच सत्तेतील चार महत्त्वाची पदे कोणाच्या वाट्याला जातील, हे ठरणार आहे. 

- सदानंद सिरसाटअकोला : भारिप-बमसंने २५ सदस्यांच्या बळावर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली. आता सत्तेतील चार सभापतींची निवड करण्यासाठी सभागृहाच्या एकूण संख्येनुसार बहुमताचा आकडा गाठावा लागणार आहे. बहुमतासाठी दोन सदस्यांची गरज असली तरी त्यासाठी कोण सोबत येणार, याचा धांडोळा भारिप-बमसंला घ्यावा लागणार आहे. सभापतींच्या निवड सभेतही भाजप कोणता पवित्रा घेईल, यावरच सत्तेतील चार महत्त्वाची पदे कोणाच्या वाट्याला जातील, हे ठरणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवड सभेत भाजपने बहिर्गमन केल्याने सभागृहातील सदस्य संख्या कमी झाली. सभागृहात उपस्थित असलेल्या ४६ सदस्यांपैकी प्राप्त बहुमतातून अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. भाजपचे सदस्य सभागृहात उपस्थित असते तर ५३ पैकी सदस्य संख्येतून बहुमत म्हणजे, २७ चा आकडा गाठावा लागला असता; मात्र भाजपच्या सदस्यांचे बहिर्गमन तसेच महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यास तयार नसल्याने ही संधी भारिप-बमसंला मिळाली. अशीच संधी चार सभापतींच्या निवड प्रक्रियेतही मिळेलच, असे नाही. सभापती निवड करण्याच्या सभेत कोणतेही समीकरण अस्तित्वात येऊ शकते. त्यावेळी भारिप-बमसंला कोंडीत पकडण्याचाही प्रयत्न होऊ शकतो. ही पदे भारिप-बमसंच्या हातातून सुटल्यास अध्यक्ष, उपाध्यक्ष पदावरच समाधान मानण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे येत्या काळात सभागृहात बहुमत ठेवण्यासाठी कोणाला जवळ केले जाते, हे येणारा काळच सांगणार आहे. 

- चार सभापतींची लवकरच निवडजिल्हा परिषदेच्या सत्ता केंद्रामध्ये चार सभापतीही आहेत. जिल्हा परिषदेच्या दहा समित्यांची वाटणी अध्यक्ष, उपाध्यक्षांसह चार सभापतींमध्ये केली जाते. त्यामध्ये जल व्यवस्थापन व स्थायी समिती अध्यक्षांकडे दिली जाते. उपाध्यक्षांना द्यावयाच्या समित्यांचे वाटप सभेतच केले जाते. निवड झालेल्या चार सभापतींना समित्या दिल्या जातात. त्यामध्ये समाजकल्याण, महिला व बालकल्याण, अर्थ व शिक्षण, कृषी व पशुसंवर्धन, बांधकाम व आरोग्य या समित्यांचा समावेश आहे. या समित्यांचे सभापतीपद मिळण्यासाठीही अनेकांची इच्छा जागृत होणार आहे. 

- सोबत कोण येणार...बहुमतासाठी भारिप-बमसंला दोन सदस्यांचीच गरज आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील कोणता पक्ष त्यांच्यासोबत येणार की भाजप सहभागी होणार, हे निवड प्रक्रियेतील मतदानाच्या वेळीच पुढे येणार आहे. भाजपने यापूर्वी भारिप-बमसंसोबत महिला व बालकल्याण सभापतीपद मिळविले होते, तर शिवसेनाही त्यावेळी सहभागी झाली होती. येत्या काळातील समीकरणातूनच सत्तेचे भवितव्य ठरणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ