शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा परिषदेच्या १७ शाळा होणार बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 02:56 IST

अकोला : कमी गुणवत्ता असल्याने पटसंख्या खालावलेल्या शाळा बंद करण्याच्या शासन निर्णयाचा फटका जिल्हय़ातील १७ शाळांना बसला आहे. विशेष म्हणजे, बंद होणार्‍या शाळांतील सद्यस्थितीत असलेल्या विद्यार्थ्यांना ज्या शाळांमध्ये समायोजित केले जात आहे, त्या शाळांचे अंतर १ ते ७ किमी आहे. शिक्षणासाठी आता विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागणार आहे. 

ठळक मुद्देचिमुकल्या विद्यार्थ्यांची सात किमीपर्यंत पायपीटबंद झालेल्या शाळा होणार दुसर्‍या शाळांमध्ये समायोजित

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कमी गुणवत्ता असल्याने पटसंख्या खालावलेल्या शाळा बंद करण्याच्या शासन निर्णयाचा फटका जिल्हय़ातील १७ शाळांना बसला आहे. विशेष म्हणजे, बंद होणार्‍या शाळांतील सद्यस्थितीत असलेल्या विद्यार्थ्यांना ज्या शाळांमध्ये समायोजित केले जात आहे, त्या शाळांचे अंतर १ ते ७ किमी आहे. शिक्षणासाठी आता विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना एक किमीच्या आतच शिक्षणाची सोय असावी, अशी शिक्षण हक्क कायद्यातील तरतूद आहे; मात्र अकोला जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये पुरेशी विद्यार्थी संख्याच नाही. गुणवत्तेच्या कारणामुळे पटसंख्या खालावली आहे. त्यामुळे त्या शाळाच बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्या शाळांतील विद्यार्थ्यांना चांगली गुणवत्ता असलेल्या शाळेत टाकण्याची तयारी केली. त्यासाठी शाळेत सर्व वर्गातील मिळून १ ते १0 पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती मागवण्यात आली. त्या शाळा बंद केल्यास विद्यार्थ्यांची लगतच्या शाळेत व्यवस्था करण्याचा पर्याय मागवण्यात आला. त्यानुसार अकोला जिल्हय़ातील १७ शाळांमध्ये कमी पटसंख्या आहे. त्या शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांचे समायोजन करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्‍यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे सादर केला. प्रस्तावाला मंजुरीनंतर शाळा बंद केल्या जाणार आहेत. त्या १७ शाळांतील चिमुकल्यांना आता ऊन, पाऊस, वार्‍याचा सामना करीत शिक्षण घ्यावे लागणार आहे. 

बंद करून समायोजन होणार्‍या शाळाजिल्हा परिषदेच्या १७ गावांतील शाळा बंद करून नवी गावच्या शाळेत समायोजित होत आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा सोनाळा येथील विद्यार्थ्यांना हातगावातील शाळेत जावे लागणार आहे. या गावांचे अंतर सात किमी आहे. साहित येथील विद्यार्थी राहित, मालपुरा-तळेगाव, लखमापूर-निहिदा, अदालतपूर-गौलखेडी, मोझरी-पारडी, जामठी खुर्द उर्दू शाळा- जामठी बुद्रूक, ठोकबर्डी- हिंगणी, सोनगिरी-कसुरा, अडोशी-कडोशी, मंडाळा-खांबोरा, दुधाळा-हातरुण, गुंजवाडा-खापरवाडा, कापरखेडा-शेखापूर, वणी-वरुड, कवठा खुर्द- सावरगाव उर्दू, वडगाव रोठे- दहीगाव या जिल्हा परिषद शाळांमध्ये समायोजित होत आहेत. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरzp schoolजिल्हा परिषद शाळा