शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा परिषदेचे कामकाज चालणार ‘व्हॉइस टायपिंग’वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 12:44 IST

अकोला : जिल्हा परिषदेच्या कामकाजात गती आणण्यासाठी संगणकावर आता थेट ‘व्हॉइस टायपिंग’द्वारे फायली तयार केल्या जाणार आहेत.

अकोला : जिल्हा परिषदेच्या कामकाजात गती आणण्यासाठी संगणकावर आता थेट ‘व्हॉइस टायपिंग’द्वारे फायली तयार केल्या जाणार आहेत. त्यासाठी सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, तसेच गरज असलेल्यांना संगणक, त्यावर अ‍ॅपद्वारे टायपिंगची सोय करण्यासाठी खरेदीचा प्रस्तावही तयार केला जाणार आहे.जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच (एमकेसीएल) महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या पुणे येथील मुख्यालयात भेट दिली आहे. त्या भेटीमध्ये प्रशासकीय कामकाजात करावयाच्या सुधारणांबाबत चर्चा झाली. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत तयार होणाºया फायलींची संख्या मोठी आहे. त्यातच फायली तयार करणाºया कर्मचाºयांची टंकलेखनाची गती, संगणकाच्या ज्ञानामध्ये बºयाच मर्यादा आहेत. त्यामुळे फायलींचा निपटारा करणे, सभांचे इतिवृत्त तयार होण्याला बराच विलंब लागतो. त्यावर मात करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी संगणकावर टंकलेखन करण्याऐवजी अद्यावत अ‍ॅपद्वारे ‘व्हॉइस टायपिंग’चा वापर करण्याची तयारी सुरू केली आहे. सर्व विभागातील कर्मचाºयांना व्हॉइस टायपिंगद्वारे फाइल तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले, तसेच संगणकावर अ‍ॅप उपलब्ध करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे. त्यासाठी ‘एमकेसीएल’कडून मदत केली जाईल. राज्यातील जिल्हा परिषदांमध्येही लवकरच हा उपक्रम सुरू होणार असल्याची माहिती आहे.- संगणक, अ‍ॅपसाठी खर्चजिल्हा परिषदेच्या विविध विभागातील संगणक कालबाह्य आहेत. त्यामुळे नवीन संगणक खरेदी करावे लागणार आहेत. त्यासाठीचा निधी आणि खरेदी प्र्रक्रिया कशी करावी, यावर जिल्हा परिषद प्रशासनाचा खल सुरू आहे. शासन निधी की सेसफंडातून खर्च करावा, या मुद्यांवरही आता हा उपक्रम राबविला जाणार की नाही, हे ठरणार आहे.- रायटिंग, टायपिंग बाद होण्याची चिन्हेफायली तयार करण्यासाठी आधी कनिष्ठ लिपिकापासून ते मुख्य अधिकाºयांपर्यंत सर्वच हस्ताक्षराने नोंदी करून स्वाक्षरी करीत, त्यानंतर काही प्रमाणात संगणकीय टायपिंग करून फायली तयार झाल्या. तरीही त्यावर मत नोंदविणारे अधिकारी हस्ताक्षरातच नोंद करून स्वाक्षरी करीत, आता ते दोन्ही प्रकार बाद होऊन थेट व्हॉइस टायपिंगचा पर्याय उपलब्ध झाला. त्यातून रायटिंग, टायपिंग बाद होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद