शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

अकोला जिल्हा परिषद राबविणार ‘दूधपूर्णा’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 12:33 IST

अकोला: जिल्हा परिषद सेसफंडातून समाजकल्याण विभागाच्या एका योजनेवर तब्बल सहा कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करणारी अकोला जिल्हा परिषद प्रथम देशात प्रथम ठरणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हा परिषद सेसफंडातून समाजकल्याण विभागाच्या एका योजनेवर तब्बल सहा कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करणारी अकोला जिल्हा परिषद प्रथम देशात प्रथम ठरणार आहे. या निधीतून दूधपूर्णा योजना राबविली जात असून, दोन दुधाळ जनावरे देण्यासाठी चिठ्ठीद्वारे सोडतीने ५२१ लाभार्थींची निवड रविवारी करण्यात आली. तसेच १४३ लाभार्थींची प्रतीक्षा यादीही तयार झाली आहे.ग्रामीण भागातील कुटुंबांना रोजगारासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात राबविला जाणारा हा दूधपूर्णा उपक्रम देशात पहिलाच असल्याचे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे, लाभार्थींना बँकेचे कर्ज, गोठा आणि बायोगॅस देण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या सेसफंडातून मागासवर्गीयांसाठी खर्च करावयाचा निधी २००८ पासून अखर्चित होता. तो संपूर्ण शिल्लक निधी एकत्रित करून त्याद्वारे मागासवर्गीयांसाठी विकास योजना राबविण्याच्या उद्देशाने सहा कोटी रुपये निधी दुधाळ जनावरे वाटपासाठी वळता करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यासाठी विशेष नियोजन केले. समाजकल्याण विभागाकडून दुधाळ जनावरे वाटपाची दूधपूर्णा योजना सुरू झाली. योजनेसाठी प्राप्त ६६४ अर्जांपैकी ५२१ लाभार्थींची निवड झाली. योजनेत प्रतिलाभार्थी ८५ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.सोबतच चांगल्या दर्जाच्या दोन म्हशी घेण्यासाठी आवश्यकतेएवढी रक्कम बँकेद्वारे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. योजनेतून स्वयंरोजगाराची निर्मिती करणाऱ्या लाभार्थींना महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत पुढील वर्षी जनावरांचा गोठा व बायोगॅस देण्यात येणार आहे.

विविध योजनांसाठी १३५२ लाभार्थी निवड४समाजकल्याण विभागाच्या विविध १५ योजनांसाठी १३५२ लाभार्थींची निवड जिल्हा परिषदेत सोडतीद्वारे करण्यात आली. त्यामध्ये महिलांना बियाणे वाटप, कुक्कुटपालनासाठी पक्षी पुरविणे, वाहन चालकाचे प्रशिक्षण, एचडीपीई पाइप, टिनपत्रे पुरविणे, प्लास्टिक ताडपत्री, शिलाई मशीन, डीझल पंप, संगणक प्रशिक्षण, स्प्रिंकलर संच पुरवठा, इलेक्ट्रिक पंप, पीव्हीसी पाइप, रोटाव्हेटर, समाजमंदिर बांधणे, उद्याने व बगिचे या योजनांचा समावेश आहे.

लाभार्थींसाठी जिल्ह्यात दूध बँकसमाजकल्याण विभागाकडून वाटप झालेल्या लाभार्थींच्या म्हशीचे दर दिवशी दहा ते बारा हजार लीटर दूध संकलन होणार आहे. त्यासाठी दूध बँकही तयार केली जाणार आहे. लाभार्थींना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी अग्रणी बँक व्यवस्थापक, सहकारी दूध संस्थेची नोंदणी करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक समाजकल्याण समितीच्या बैठकीत उपस्थित होते. यावेळी त्यांच्याशी चर्चेद्वारे हा उपक्रम करण्याचे ठरले.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद