शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अकोला जिल्हा परिषद उपाध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 10:45 IST

त्यांच्या संपर्कातील कर्मचाऱ्यांसह आठ जणांचे ‘थ्रोट स्वॅब’ नमुने घेण्यात आले.

अकोला : जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मंगळवारी जिल्हा परिषदेतील उपाध्यक्षांच्या कार्यालयाचे निर्जंतुकीकरण (सॅनिटाइझ) करण्यात आले असून, त्यांच्या संपर्कातील कर्मचाऱ्यांसह आठ जणांचे ‘थ्रोट स्वॅब’ नमुने घेण्यात आले.दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कार्यालयातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यानंतर आॅगस्टमध्ये जिल्हा परिषदेतील अर्थ आणि आरोग्य विभागातील दोन कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले होते. जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्री राठोड यांच्यासह त्यांचे पती हिरासिंग राठोड कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्हा परिषदेतील उपाध्यक्षांच्या कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने, त्यांच्या संपर्कातील चार कर्मचारी आणि मुलासह आठ जणांच्या घशातील स्रावाचे (थ्र्रोट स्वॅब) नमुने घेण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी सांगितले.कार्यालय कुलूपबंद!जिल्हा परिषद उपाध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने, जिल्हा परिषदेतील त्यांच्या कार्यालयाचे निर्जंतुकीकरण केल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनामार्फत उपाध्यक्ष कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून कार्यालयात प्रवेश बंद करण्यात आला आहे. 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याAkola ZPअकोला जिल्हा परिषद