शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेसाठी पक्षांचे ‘स्टार प्रचारक’ गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 12:31 IST

भाजप, शिवसेना, काँग्रेस, भारिप-बमंस या चार पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कोण धावून येणार, हा मुद्दा अखेरच्या दिवसातही अनुत्तरीत आहे.

- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणूक कार्यक्रमात पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येणाऱ्या प्रमुख राजकीय नेते, स्टार प्रचारकांची यादी महिनाभरापासून निवडणूक आयोगाला मिळालीच नाही. त्यामुळे भाजप, शिवसेना, काँग्रेस, भारिप-बमंस या चार पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कोण धावून येणार, हा मुद्दा अखेरच्या दिवसातही अनुत्तरीत आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या २० नेत्यांची यादी निवडणूक विभागाला देण्यात आली आहे.राज्यातील सहा जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. ७ जानेवारी रोजी मतदान होत आहे. दरम्यान, आता निवडणूक रिंगणातील लढतीचे चित्र सोमवारी स्पष्ट होत आहे. त्यानंतर उमेदवारांच्या प्रचारासाठी केवळ पाच दिवस मिळणार आहेत. या अल्प कालावधीत पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रचार झाल्यास त्याचा फायदा उमेदवारांना होऊ शकतो. ही जबाबदारी स्टार प्रचारकांची असते. पक्ष स्तरावरून स्टार प्रचारकांची नावे आयोगाकडे दिली जातात. आयोगाला माहिती दिल्यानंतर ती यादी स्थानिक प्रशासनाकडे पुढील खबरदारीसाठी दिली जाते. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने १९ नोव्हेंबर रोजीच तसे पत्र सर्वच राजकीय पक्षांना दिले. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस वगळता इतर कोणत्याही पक्षाने स्टार प्रचारकांची यादी आयोगाकडे दिली नसल्याची माहिती आहे.विशेष म्हणजे, राज्यातील पालघर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर या सहा जिल्हा परिषदांसह ४४ पंचायत समित्यांची निवडणूक होत आहे. राज्यात एकाच वेळी निवडणूक होत आहे. तसेच सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने ही निवडणूक लढवली जात आहे. पक्षांच्या एबी फॉर्मवर उमेदवार लढत असल्याने त्यांचा प्रचार करण्यासाठी स्टार प्रचारक देण्याची जबाबदारीही पक्षांची आहे; मात्र जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम अंतिम टप्प्याकडे जात असताना राजकीय पक्षांच्या पातळीवर कमालीची सामसूम पाहावयास मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने २० नेत्यांच्या यादीत अकोला जिल्ह्यातील अमोल मिटकरी यांना स्थान दिले आहे. त्यापैकी किती नेत्यांच्या सभा आयोजित केल्या जातात, यावरही उमेदवारांचा प्रचार आणि विजयाचे गणित अवलंबून आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद