अकोला: जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेत सन २0१६-१७ या वर्षासाठी २९ कोटी ९ लाख ७२ हजार रुपयांचे अंदाजपत्रक सोमवारी मंजूर करण्यात आले. त्यामध्ये जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणार्या विविध योजना आणि विकासकामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेत अर्थ सभापती राधिका धाबेकर यांनी जिल्हा परिषदेचे सन २0१६-१७ या वर्षीचे विभागनिहाय अंदाजपत्रक मांडले. जिल्हा परिषदेला ११ कोटी २६ लाख ५0 हजार रुपये महसुली प्राप्ती अपेक्षित असून, भांडवली जमा रक्कम २ लाख ६७ हजार रुपये आणि आरंभीची शिल्लक १५ कोटी १८ लाख ४६ हजार रुपये विचारात घेता, २ लाख २४ हजार रुपये शिलकीचे आणि २९ कोटी ९ लाख ७२ हजार रुपये मूळ खर्चाचे अर्थ सभापतींनी मांडलेले अंदाजपत्रक सर्वानुमते मंजूर करण्यात आले. मंजूर करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात कृषीसह विविध योजना आणि विकासकामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत अर्थ सभापती राधिका धाबेकर यांनी जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकाचे वाचन केले. यावेळी उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख, कृषी सभापती रामदास मालवे, समाजकल्याण सभापती गोदावरी जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, सभेचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) के.आर. तापी यांच्यासह सदस्य आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. मनपा हद्दवाढीला विरोधाचा ठराव मंजूर!महानगरपालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीमध्ये शहराजवळील २४ गावांचा समावेश करण्याचा घाट रचला जात असून, शहराची अवस्था बकाल झाली आहे. रस्ते, पिण्याचे पाणी अशा समस्या असताना, हद्दवाढीमध्ये शहराजवळील २४ गावांचा समावेश मनपा क्षेत्रात केल्यास गावांचे काय होणार, असा सवाल उपस्थित करीत जिल्हा परिषद सदस्य दामोदर जगताप, चंद्रशेखर पांडे गुरुजी,ज्योत्स्ना चोरे, विजय लव्हाळे व इतर सदस्यांनी मनपा हद्दवाढीस तीव्र विरोध दर्शविला. आधी शहराचा विकास करण्यात यावा, नंतरच हद्दवाढीमध्ये गावांचा समावेश करावा, अशी मागणी सदस्यांनी केली. सदस्यांच्या मागणीनुसार हा ठराव सभेत मंजूर करण्यात आला.ह्यकृषीह्णसाठी भरीव तरतूद करा!जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात कृषी विभागासाठी करण्यासाठी आलेली तरतूद लक्षात घेता, कृषी विभागासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी केली. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी विशेष मदतीसह कृषी विभागासाठी अंदापत्रकात एक कोटी रुपयांची वाढ करण्याची मागणी त्यांनी केली.
अकोला जिल्हा परिषदेचे २९ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर
By admin | Updated: March 22, 2016 02:23 IST