शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जि.प.ने केला केवळ १२ टक्के निधी खर्च!

By admin | Updated: January 26, 2017 10:42 IST

नियोजन समिती, सेसफंड, शासनाच्या विविध निधी खर्चाचे आव्हान.

अकोला: जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागाचा खर्च सरासरी १२ टक्के असल्याची बाब सोमवारी अर्थ समितीच्या तहकूब सभेत उघड झाली. आर्थिक वर्षातील तिसर्‍या तिमाहीतील खर्चाची ही आकडेवारी पाहता जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागासह सर्वच विभागाचा सुरू असलेल्या कारभाराचा पर्दाफाश झाला आहे. त्याची गंभीर दखल घेत सभापती पुंडलिकराव अरबट यांनी सर्व संबंधितांना नोटिस देण्यासोबत कोणत्याही परिस्थितीत मार्चअखेर निधी खर्च करण्याचे आदेश दिले. गेल्या वर्षभरात प्रथमच ह्यलोकमतह्णच्या पाठपुराव्यामुळे अर्थ समितीपुढे जमा-खर्चाचा हिशेब ठेवण्यात आला. त्यातून जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांनी केलेल्या खर्चाची वस्तुस्थिती पुढे आली. विविध विभागांना शासनाकडून प्राप्त, जिल्हा परिषदेचा सेसफंड, आदिवासी उप, विशेष घटक योजनांतून मिळालेल्या निधी खर्चाचे प्रमाण अत्यल्प आहे. ८८ टक्के शिल्लक निधी आता केवळ एका महिन्यात कसा खर्च होईल, ते आव्हान आता जिल्हा परिषदेला पेलणे अशक्य ठरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या निधी खर्चाचा हिशेब सातत्याने अर्थ समितीपुढे आवश्यक असल्याची बाब ह्यलोकमतह्णने सातत्याने मांडली. निधी खर्चाची प्रगती पदाधिकार्‍यांपुढे आल्यास संबंधितांना त्यासाठी विचारणा करता येते; मात्र हिशेबच समितीपुढे ठेवण्याला फाटा देण्यात आला. त्यामुळेच चालू वर्षातही समाजकल्याण, महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा, कृषी, शिक्षण, लघुसिंचन, पशुसंवर्धन, बांधकाम, आरोग्य, शिक्षण, पंचायत या सर्व विभागांना शासनाकडून आलेल्या निधी खर्चात जिल्हा परिषद माघारली आहे.