शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील युवा उद्योजकाची सातासमुद्रापार भरारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2016 01:40 IST

जर्मनीत कंपनी सुरू केल्यानंतर आता भारतातही व्यवसाय विस्तार

अकोला : उद्योगांचा मोठा अनुशेष असलेल्या अकोल्यासारख्या शहरातील युवकाने उद्योगक्षेत्रात सातासमुद्रापार भरारी घेतली. हा युवक आजच्या युवा पिढीसाठी निश्‍चितच प्रेरणादायी आहे. माजीमंत्री बाबासाहेब धाबेकर यांचा नातू रोहन सुनील धाबेकर यांनी शिक्षणक्षेत्रात मोठी क्षेप घेतली. त्यानंतर देश-विदेशात वेगवेगळय़ा क्षेत्रात काम केल्यानंतर र्जमनीत उद्योग सुरू केला. स्वत:ची बँकींग कंपनी स्थापन केली. दोन वर्षांत ही कंपनी नावारूपाला आणल्यानंतर मायदेशी बंगळुरू येथेसुद्धा कंपनी स्थापन करून, त्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकपद रोहन स्वत: सांभाळत आहे. त्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. आर्मी ऑफिसर म्हणून काम करताना ७८ गुरखा रायफल रेजिमेंटमध्ये देशसेवा केली. लंडन येथील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठातून पदवी प्राप्त केल्यानंतर २ वर्षे लंडन येथील 'गोल्डमॅन सॅक्स' या जगविख्यात बँकेत काम केले. त्यानंतर र्जमनीची राजधानी बर्लिन येथे कंपनी सुरू केली. दोन वर्षांत ही कंपनी नावारूपाला आणली. तीच कंपनी आता बंगळुरू येथे सुरू केली आहे. दिशाहीन झालेल्या युवकांसाठी त्यांचे हे कार्य निश्‍चितच प्रेरणादायी आहे. अर्थातच अशा उद्योगांसाठी आर्थिक पाठबळ असणे आवश्यक आहे. ते रोहन यांना मिळाले. जपानसारख्या देशातील राजघराण्यातील व्यक्तींसोबत त्यांनी काम केले आहे.त्यांनी विदेशात कंपनी सुरू केल्यानंतर मायदेशाला न विसरता भरभराटीस आलेला उद्योग भारतात सुरू करून येथील औद्योगिक विकासास हातभार लावला. येथील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार निश्‍चितच कौतुकास्पद आहे.पालकमंत्र्यांनी केले कौतुकसातासमुद्रापार भरारी घेत यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपास आल्यानंतर मायदेशात परत येऊन उद्योग सुरू करणार्‍या रोहन यांचा शुक्रवारी धाबेकर फार्म हाऊसवर एका छोटेखानी कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. या सोहळ्य़ाला खासदार संजय धोत्रे, आ. भाऊसाहेब फुंडकर, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, आ. राजेंद्र पाटणी, आ. गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, मनपा आयुक्त अजय लहाने, नानासाहेब उजवणे, वसंतराव खेडकर, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, वसंतराव खोटरे, अनिल धाबेकर, डॉ. सुभाष कोरपे, बाबाराव विखे, सुनील पाटील, अँड. अनंत खेळकर यांच्यासह गणमान्य व्यक्तींनी हजेरी लावली होती.