अकोला: सातारा येथे झालेल्या आठव्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट पुरुष व महिलांच्या नेटबॉल स्पर्धेत अकोला जिल्हा महिला संघाने उपविजेतेपद पटकाविले. अकोला संघाला पुणे संघाकडून अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.साखळी सामन्यात अकोला संघाने भंडारा, सोलापूर, सांगली संघावर मात करीत केली. उपउपान्त्य सामन्यात यजमान सातारा संघावर, तर उपान्त्य सामन्यात भंडारा संघाचा दणदणीत पराभव केला. अंतिम सामनयात पुणे संघाविरुद्ध १६-१४ अशा गुणफरकाने पराभव मान्य केला. रोहतक (हरियाणा) येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंची स्पर्धेतूान निवड करण्यात आली.संघामध्ये कर्णधार प्रगती गावंडे, उपकर्णधार आरती तिवारी, शुभांगी श्रीनाथ, पूजा तामणे, ज्योती डाहेलकर, नेहा महामुने, पूनम गाडगे, चैताली गुप्ता, रक्षा पांडे, पूजा जानोकार यांचा समावेश होता. क्रीडा मार्गदर्शक जयदीप सोनखासकर यांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभल्ो. स्पर्धा स्थळी अकोला संघाचा चषक व प्रमाणपत्र देऊन जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी, डॉ. ललित जिवानी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अकोला संघटनेचे अध्यक्ष डॉ. पुरूषोत्तम तायडे, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, अजाबराव वहिले यांनी खेळाडूंचे कौतुक केले.
राज्यस्तर नेटबॉल स्पर्धेत अकोला महिला संघ उपविजेता
By admin | Updated: November 11, 2014 23:34 IST