शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीला ठेंगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 15:22 IST

मुख्य रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्याचे आदेश महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी ‘एपी अ‍ॅण्ड जीपी’कंपनीच्या प्रतिनिधींना दिले होते. कंपनीने प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीला ठेंगा दाखवत अद्यापपर्यंतही रस्ते दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ केला नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्दे सद्यस्थितीत शहराच्या प्रमुख रस्त्यांलगतचा भाग खोदून जलवाहिनी टाकल्या जात आहे. खोदकाम केलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे अपेक्षित असताना मागील तीन ते चार महिन्यांपासून कंत्राटदाराने रस्ते दुरुस्तीला प्रारंभ केला नसल्याचे समोर आले आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीचा खर्च मनपा प्रशासनाकडून अदा केला जाणार असल्याची माहिती आहे.

अकोला: ‘अमृत’ योजनेच्या माध्यमातून शहरात नवीन जलवाहिनीचे जाळे टाकल्या जात आहे. यासाठी खोदण्यात आलेल्या मुख्य रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्याचे आदेश महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी ‘एपी अ‍ॅण्ड जीपी’कंपनीच्या प्रतिनिधींना दिले होते. कंपनीने प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीला ठेंगा दाखवत अद्यापपर्यंतही रस्ते दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ केला नसल्याचे चित्र आहे. या कामावर तांत्रिक सल्लागार म्हणून कर्तव्य बजावणारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व मनपाच्या जलप्रदाय विभागाने झोपेचे सोंग घेतल्याचे दिसून येत आहे.केंद्र व राज्य शासनाच्या ‘अमृत योजने’च्या माध्यमातून शहरात भूमिगत गटार योजना व संपूर्ण शहराची जलवाहिनी बदलण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या दोन्ही कामांवर देखरेख ठेवण्यासाठी शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त केले. शहरात पहिल्या टप्प्यात ८७ कोटी रुपयांतून जलवाहिनीचे जाळे टाकण्याचा कंत्राट ‘एपी अ‍ॅण्ड जीपी’ कंपनीला देण्यात आला आहे. १४७ किलोमीटर महान धरण ते अकोला शहरापर्यंत आणि २६५ किलोमीटर शहरातील अंतर्गत भागात नवीन जलवाहिनी टाकल्या जाणार आहे. सद्यस्थितीत शहराच्या प्रमुख रस्त्यांलगतचा भाग खोदून जलवाहिनी टाकल्या जात आहे. खोदकाम केलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे अपेक्षित असताना मागील तीन ते चार महिन्यांपासून कंत्राटदाराने रस्ते दुरुस्तीला प्रारंभ केला नसल्याचे समोर आले आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीचा खर्च मनपा प्रशासनाकडून अदा केला जाणार असल्याची माहिती आहे. सध्या पावसाचे दिवस लक्षात घेता व ठिकठिकाणी मुख्य रस्त्यांची दुरवस्था पाहता कंत्राटदाराने रस्ते दुरुस्तीला प्रारंभ करण्याची मागणी अकोलेकर करीत आहेत.आयुक्तांच्या आदेशानंतर किती रस्त्यांची दुरुस्ती?जलवाहिनीचे जाळे टाकल्यानंतर संबंधित रस्त्याची दुरुस्ती करून देण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. कंपनीचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दोन महिन्यांपूर्वी आधी रस्ते दुरुस्त करा, त्यानंतरच नवीन जलवाहिनीचे जाळे टाकण्याचा आदेश कंत्राटदाराला दिला होता. या दोन महिन्यांच्या कालावधीत कंत्राटदाराने किती रस्त्यांची दुरुस्ती केली, याचा मनपाकडे कोणताही लेखाजोखा नसल्याची माहिती आहे.

सत्ताधाऱ्यांसह विरोधकांची चुप्पी!जलवाहिनीचे जाळे टाकणाºया कंपनीकडून मुख्य रस्त्यांची ऐशीतैशी केली जात असताना त्याला आवर घालण्याची जबाबदारी असणाºया सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्ष काँग्रेसने चुप्पी साधणे पसंत केले आहे. तोंडावर बोट ठेवण्यासाठी नेमका कोणता व्यवहार पार पडला, याबद्दल अकोलेकरांमध्ये चर्चेला ऊत आला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका