शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात होणार महाआरोग्य अभियान; पालकमंत्र्यांचा पुढाकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 14:15 IST

अकोला : जनसामान्यांच्या आरोग्यासाठी अकोला शहरात महाआरोग्य अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे.

अकोला : जनसामान्यांच्या आरोग्यासाठी अकोला शहरात महाआरोग्य अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्यावतीने ३0 व ३१ डिसेंबर २०१८ रोजी होणाऱ्या या अभियानाच्या यशस्वीतेसाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली.जिल्हाधिकारी यांच्या दालनात सोमवारी झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. घोरपडे, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुखी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राठोड, आयएमएचे डॉ. नरेश बजाज, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. सुनील वाठोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सिरसाम, डॉ. अश्विनी खडसे हे उपस्थित होते.या अभियानात जिल्ह्यातील रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. अभियान यशस्वीतेसाठी बैठकीत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विविध सूचना दिल्या. विविध कामांसाठी वेगवेगळ्या टीम नियुक्त करण्याचे निर्देश त्यांनी दिले.या अभियानात सरकारीसह विविध खासगी रुग्णालयांच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे सहकार्य घेतले जाणार आहे, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, विविध नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचासुद्धा अभियानात सहभाग राहणार आहे. एक्स-रे, सोनोग्राफी, विविध चाचण्यांसाठी पॅथॉलॉजीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. एमआरआयसुद्धा काढून दिला जाणार आहे. रुग्णांसाठी औषधेही उपलब्ध करून दिली जाणार आहेत.अभियानात विविध आजारांसाठी साधारण ३0 बाह्यरुग्ण स्टॉल राहणार आहेत. नोंदणीसाठी स्वतंत्र कक्ष राहणार आहे. सर्व प्रकारच्या तपासण्या अभियानात केल्या जाणार आहेत. या सर्व कामांसाठी टीमची नियुक्ती करावी, नोडल अधिकाºयाची नेमणूक करावी, तसेच परस्परांमध्ये समन्वय ठेवून जनसामान्यांना सुलभपणे आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना पालकमंत्री यांनी दिली. या अभियानाची जास्तीत प्रचार-प्रसिद्धी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

प्राथमिक आरोग्य केंद्रात होणार पूर्वतपासणीअभियानापूर्वी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत रुग्णांची प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर या रुग्णांची पुढील तपासणी महाआरोग्य अभियानात केली जाईल. अभियानात गंभीर आजाराचे निदान झाल्यास रुग्णांवर पुढील उपचारही केले जाणार आहेत, तसेच आयुष्मान भारत योजनेचे गोल्डन कार्डचे वाटप अभियान काळात केले जाणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील