शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

अकोल्याची सर्वाधिक रक्तपेढ्या व रक्तदात्यांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण होईल - डॉ. राजेश कार्यकर्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 13:18 IST

अकोला: येणाऱ्या वर्षात सर्वात जास्त ब्लड बॅक व रक्तदाते म्हणून हा जिल्हा ओळखला जाणार आहे. त्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. राजेश कार्यकर्तेयांनी मंगळवारी दिली.

अकोला: येणाऱ्या वर्षात सर्वात जास्त ब्लड बॅक व रक्तदाते म्हणून हा जिल्हा ओळखला जाणार आहे. त्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. राजेश कार्यकर्तेयांनी मंगळवारी दिली.डॉ.भाऊसाहेब देशमुख यांच्या १२० व्या जयंती उत्सवानिमित्त श्री. शिवाजी महाविद्यालयात २४ ते २७ डिसेंबरपर्यंत चार दिवस प्रबोधनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. जयंती उत्सवाच्या दुसºया दिवशी सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. सकाळी १० वाजता युवा रक्तदान शिबिराचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्याहस्ते करण्यात आले. भाषणामध्ये डॉ. कार्यकर्ते यांनी अकोला जिल्ह्यात येणाºया वर्षात सर्वात जास्त ब्लड बँक असणारा जिल्हा होण्याचा मनोदय व्यक्त केला. रक्तदान ही लोकचळवळ व्हायला पाहिजे, असे त्यांनी म्हटले. याप्रसंगी युवा विश्व रक्तदाता संघाचे अ‍ॅड. संतोष गावंडे यांनी युवा विश्व संघाच्या कार्याबद्दल व रक्तदान शिबिराबद्दल माहिती दिली. एका व्यक्तीच्या रक्तदानातून चार जणांचे प्राण वाचत असते व युवकांनी सुदृढ शरीरासाठी व विविध चाचण्या होण्याच्या दृष्टीनेही रक्तदान शिबिराचा उपयोग करावा, असे त्यांनी सांगितले.सकाळच्या सत्राच्या कार्यक्रमाला अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.संतोष कोरपे यांनी ‘नेशन बिल्डिंग’ मध्ये तरुणांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगताना सौर उर्जेचा उपयोग व्हावा, असा शाश्वत विकासाचा संदेश दिला. पहिल्या सत्राच्या युवा रक्तदान शिबिरामध्ये महाविद्यालयामध्ये रक्तदानाकरिता विद्यार्थ्यांचा व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचा सहभाग होता. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. संतोषकुमार कोरपे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. अनंत डवंगे, मनपा नगरसेवक आरती घोगलिया, नगरसेवक राजेश गिरी, रक्तदान समन्वयक डॉ. अर्चना पेठे, प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे आदींची उपस्थिती होती. संचालन शुभम भोंडे यांनी तर आभार डॉ संजय तिडके यांनी मानले.दुपारच्या सत्रात खुली प्रश्नमंजूषा आयोजित केली होती. प्रश्नमंजूषेचे संयोजन प्रा. नितीन मोहोड यांनी केले. स्पर्धात्मक परीक्षांच्या दृष्टीने ही स्पर्धा रंगतदार झाली व विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. यानंतर स्व. संध्या उखळकर स्मृतिप्रीत्यर्थ भावगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शिवाजी महाविद्यालय अकोलाद्वारे पूर्वा देशमुख, रागिणी खोडवे, विदर्भ संगीत अ‍ॅकॅडमी अकोलाद्वारे गोपाल गावंडे, शुभम नारे, शासकीय अध्यापक महाविद्यालयाद्वारे वैशाली पांडे, वैभव निंबाळकर, एल.आर.टी महाविद्यालयाद्वारे अंकिता पांडे, श्रृती जहागिरदार तसेच सीताबाई महाविद्यालयाचे भावगीत स्पर्धेचे प्रतिनिधित्व मुक्ता धुमाळे या विद्यार्थिनींनी केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाBlood Bankरक्तपेढी