शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

अकोल्याला वानऐवजी जिगाव प्रकल्पातून पाणी देणार - संजय कुटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 16:15 IST

अकोला शहराला वानऐवजी जिगाव प्रकल्पात पाणी आरक्षित करता येईल, असा पर्याय राज्याचे कामगार कल्याण मंत्री संजय कुटे यांनी सुचविला.

अकोट : अकोला शहराला वान धरणातून पाणी देण्यासाठी तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. या पृष्ठभूमीवर अकोला शहराला वानऐवजी जिगाव प्रकल्पात पाणी आरक्षित करता येईल, असा पर्याय राज्याचे कामगार कल्याण मंत्री संजय कुटे यांनी सुचविला. अकोट येथे भाजपच्या पेज प्रमुखांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथे अकोट मतदारसंघातील पेज प्रमुख यांच्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आ. प्रकाश भारसाकळे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कामगार कल्याण व मागासवर्गीय विकासमंत्री ना. संजय कुटे उपस्थित होते. ना. कुटे पुढे म्हणाले की, जिगाव हा प्रकल्प वानपेक्षा खूप मोठा आहे. या प्रकल्पातून अकोल्याला पाणी दिले तर अंतर २० ते २२ किमी वाढेल. ते सोयीचे होणार आहे. त्यामुळे भविष्यात अकोल्यासाठी जिगावमधून पाणी आरक्षित करून ते शहरापर्यंत पोहोचविण्यासाठी आमदार भारसाकळे यांना मदत करू, अशी ग्वाहीही ना. कुटे यांनी यावेळी दिली. आमदार प्रकाश भारसाकळे यांनी अकोट विधानसभेत गत पाच वर्षांत केलेल्या कामाची माहिती सर्वांसमोर मांडली. भविष्यात हा मतदारसंघ पूर्णपणे विकसित करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी अकोटमधील मीराजी महाराज संस्थानला दीड कोटी रुपये निधी मंजूर केल्याबद्दल संस्थानच्यावतीने आमदार भारसाकळेयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तेजराव थोरात, अ‍ॅड. बाळासाहेब आसरकर, श्रीकृष्ण मोरखडे, डॉ. संजय शर्मा, पुरुषोत्तम चौखंडे, शेरूद्दीनभाई, अबरारभाई, राजेश नागमते, नयना मनतकार, जयश्री पुंडकर, हरिनारायण माकोडे, संदीप उगले, राजेश रावणकर, कणक कोटक, गजानन उंबरकर, रामदास भेंडे, ओम सुईवाल, राजेश पाचाडे, मधुकर पाटकर, अनिरुद्ध देशपांडे, संतोष राऊत, मुश्ताक पटेल, संतोष झुनझुनवाला, उमेश बहाकर, रवींद्र केवटी, योगेश पुराडउपाध्ये, विठ्ठल वाकोडे, श्याम गावंडे, मंगेश पटके, मनोज चंदन, विलास बोडखे, रमेश दुतोंडे, उमेश पवार, प्रदीप मोरे, पुंजाजी मानकर, अतुल सोनखासकर, दीपक मुंडकार, सरपंच दिनेश पवार, सरपंच गणेश शनवारे, सरपंच गणेश पवार, माजी सरपंच माणिकराव सोनोने, संजय सोनोने, अनिल सोनोने व विक्रम सोलकर यांनी केला. यावेळी मोठ्या संख्येने पेज प्रमुख, बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व आदिवासी बांधव उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Sanjay Kuteडॉ. संजय कुटेWan Projectवान प्रकल्पakotअकोट