शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अकोला शहरात होणार ‘एलईडी’चा झगमगाट!

By admin | Updated: April 2, 2016 01:35 IST

नऊ प्रमुख रस्त्यांचा समावेश; लोकप्रतिनिधींचा पुढाकार.

अकोला: शहरातील मुख्य रस्त्यांवर एलईडीच्या प्रकाशमान पथदिव्यांमुळे झगमगाट होणार आहे. एलईडी पथदिव्यांसाठी आमदार गोवर्धन शर्मा यांनी शासनाकडे निधीची मागणी लावून धरली असता, शासनाने मनपाला मूलभूत सुविधेंतर्गत १0 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यासंदर्भात मनपाला पत्र प्राप्त झाले आहे.महापालिका प्रशासनाने वीज बचत करण्याच्या उद्देशातून शहरातील मुख्य रस्त्यांवर सीएफएल लाइट लावले. २00६ पूर्वी शहरात पिवळ्य़ा सोडियम पथदिव्यांचा वापर होत असे. अत्यंत प्रकाशमान असलेल्या सोडियम लाइटमुळे विजेचा जास्त वापर होऊन त्याचे देयक प्रशासनाला द्यावे लागत होते. यावर उपाय म्हणून सीएफएल लाइटचा पर्याय समोर आला. मात्र, सीएफएलच्या पथदिव्यांमुळे लख्ख प्रक ाश मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. एका पथदिव्यांत चार नळ्य़ा लावल्या जातात. यापैकी बहुतांश वेळा दोन किंवा तीन नळ्य़ा बंद राहत असल्याने अकोलेकरांना रस्त्यांवर अंधूक उजेडाचा सामना करावा लागतो. सायंकाळ झाल्यानंतर शहरातील रस्त्यांवर पथदिव्यांचा झगमगाट होणे अपेक्षित असताना अंधूक उजेड पडतो. या सर्व बाबी लक्षात घेता, आमदार गोवर्धन शर्मा यांनी मुख्य रस्त्यांवर एलईडी लावण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली असता, शासनाने १0 कोटी रुपये निधी मंजूर केला. यामुळे भविष्यात मुख्य रस्त्यांवर लख्खं पथदिव्यांचा झगमगाट पहावयास मिळणार, हे निश्‍चित झाले आहे.