शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : अडीच महिन्यांत इमारतीचा भाग का हटवला नाही? आयुक्त वाघ यांनी सुनावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 01:56 IST

महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गोरक्षण रोडवरील मालमत्ताधारकांना सुनावले. बुधवारी सकाळी मनपाच्यावतीने गोविंद सोढा यांच्या इमारतीचा भाग तोडण्याची कारवाई सुरू झाल्यामुळे गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाचे रखडलेले काम निकाली निघणार आहे. 

ठळक मुद्देगोरक्षण रोडवरील इमारतीवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अडीच महिन्यांपासून इमारतीचा अतिक्रमित भाग न हटवल्यामुळे गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाला विलंब झाला. तुम्हाला स्वत: इमारतीचा भाग तोडण्याची मुभा दिली होती. हा शहराच्या विकासाचा प्रश्न असल्यामुळे आता आमचीच यंत्रणा इमारतीचा भाग काढणार असल्याचे स्पष्ट करत महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गोरक्षण रोडवरील मालमत्ताधारकांना सुनावले. बुधवारी सकाळी मनपाच्यावतीने गोविंद सोढा यांच्या इमारतीचा भाग तोडण्याची कारवाई सुरू झाल्यामुळे गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाचे रखडलेले काम निकाली निघणार आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांमध्ये समावेश असणार्‍या गोरक्षण रोडच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाले असतानाच महापारेषण कार्यालय ते इन्मक टॅक्स चौक ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंतच्या मार्गावर ‘बॉटल नेक’ निर्माण होण्याची चिन्ह होती. महापालिका प्रशासनाने रस्ता रुंदीकरणासाठी रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूंच्या इमारतींचे मोजमाप करून इमारतींचा अतिक्रमित भाग तोडण्याची कारवाई सुरू केली होती. मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांची १0 नोव्हेंबर रोजी बदली होताच गोरक्षण रोडचे काम मंदावल्याचे समोर आले. त्यावेळी महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौकातील काही मालमत्ताधारकांना त्यांच्या इमारतींचा भाग तोडण्यासाठी मुदत दिली होती. मुदतीचा कालावधी उलटून गेल्यावरही काही मालमत्ताधारकांनी इमारतीचा भाग तोडलाच नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. या प्रकारामुळे गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाचे काम खोळंबले होते. मध्यंतरी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी संबंधित मालमत्ताधारकांना मनपात पाचारण करून त्यांना तातडीने इमारतीचा भाग हटविण्याचे निर्देश दिले होते. अखेर बुधवारी मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या उपस्थितीत गोविंद सोढा यांच्या इमारतीचा भाग तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली. जेसीबीचा वापर न करता मजुरांच्या माध्यमातून इमारत तोडण्याला प्रारंभ करण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चौव्हान, मनपाचे नगररचनाकार विजय इखार, शहर अभियंता इक्बाल खान, सहा. नगररचनाकार संदीप गावंडे, राजेंद्र टापरे, क्षेत्रीय अधिकारी आर. घनबहाद्दुर, विद्युत विभाग प्रमुख अमोल डोईफोडे उपस्थित होते.

मुक्ता प्लाझावर संक्रांत?मनपाने इन्कम टॅक्स चौकातील मुक्ता प्लाझा कॉम्प्लेक्सच्या तळघराची जागा रस्त्यासाठी संपादित केली आहे. कॉम्प्लेक्सपासून विद्युत वाहिनी जाणार असल्यामुळे पहिल्या मजल्यावरील किमान साडेचार फूट जागा महावितरण व मनपा प्रशासनाला घ्यावी लागणार आहे; अन्यथा महावितरणच्या निकषानुसार विद्युत वाहिनीचे जाळे टाकता येणार नाही. त्यामुळे मुक्ता प्लाझावर संक्र ांत येण्याची दाट चिन्ह आहेत.

गोरक्षण रोडची केली पाहणीमहापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी बुधवारी गोरक्षण रोडच्या कामाची व रस्त्यालगतच्या इमारतींची पाहणी केली. रस्त्याच्या आड येणार्‍या इमारतींचा भाग काढावाच लागणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यासंदर्भात काही मालमत्ताधारकांसोबतही त्यांनी चर्चा केली. 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाcommissionerआयुक्तGaurakshan Roadगौरक्षण रोड