शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : खारपाणपट्टय़ातील गावांना मिळणार ‘वान’चे पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 01:34 IST

अकोला : खारपाणपट्टय़ातील ५५ गावांमध्ये टँकरने सुरू असलेला पुरवठा बंद करून, त्याऐवजी ८४ खेडी योजनेतून त्यापैकी ४४ गावांना पुरवठा करण्याच्या उपाययोजनेसाठी शासनाने ३ कोटी ६८ लाख रुपयांच्या प्रस्तावाला १९ डिसेंबर रोजी मान्यता दिली आहे. अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्याने त्या गावांना आता वानचे पाणी मिळणार आहे. 

ठळक मुद्देआ. सावरकर यांचा पाठपुरावा खांबोरा योजनेतील टँकरग्रस्त ४४ गावांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खारपाणपट्टय़ातील ५५ गावांमध्ये टँकरने सुरू असलेला पुरवठा बंद करून, त्याऐवजी ८४ खेडी योजनेतून त्यापैकी ४४ गावांना पुरवठा करण्याच्या उपाययोजनेसाठी शासनाने ३ कोटी ६८ लाख रुपयांच्या प्रस्तावाला १९ डिसेंबर रोजी मान्यता दिली आहे. अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्याने त्या गावांना आता वानचे पाणी मिळणार आहे. खारपाणपट्टय़ातील गावांसाठी जीवनवाहिनी असलेली ६४ खेडी पाणी पुरवठा योजना पावसाळ्य़ातच म्हणजे ऑगस्टमध्ये बंद पडली. त्यामुळे मोठय़ा संख्येने असलेल्या या गावांना पाणी पुरवठा कोठून करावा, ही समस्या उभी ठाकली. अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी सप्टेंबर २0१७ पासूनच टंचाई आराखडा मंजूर करून घेत या ४४ गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला. त्या गावांना वान धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठीचा तात्पुरता प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने तयार केला. जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन समितीने मंजुरी दिली. त्यानंतर विभागीय आयुक्तांकडून पाणी पुरवठा उपाययोजना, उपाययोजनांना प्रशासकीय मंजुरीसाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अपर मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली गठित समितीकडे सादर करण्यात आला. समितीने १५ डिसेंबर २0१७ रोजी बैठकीत त्यावर चर्चा केली. सन २0१७-२0१८ च्या टंचाई कालावधीसाठी अकोला तालुक्यातील खांबोरा ६४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतील ४४ गावांना तातडीची ४,२0,८२,२00  इतक्या रकमेच्या कामास प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव होता. त्यामध्ये खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतील ४४ गावांसाठी अकोट ८४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतील चोहोट्टा गावाजवळील जलवाहिनीला टॅपिंग करून तातडीची पाणी पुरवठा योजना प्रस्तावित आहे. त्यानुसार प्रस्तावात समावेश असलेल्या एकूण ३ कोटी ६८ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या प्रस्तावास १५ डिसेंबर २0१७  रोजीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 

योजनेतील टँकरग्रस्त गावेटँकरने पुरवठा सुरू असलेल्या ५५ गावांमध्ये अकोला तालुक्यातील सांगवी खुर्द, गोपालखेड, वल्लभनगर, गांधीग्राम, सांगवी बुद्रूक, हिंगणा तामसवाडी, फरार्मदाबाद, निंभोरा, नवथळ, खेकडी, परितवाडा, पाळोदी, निराट, वैराट, गोत्रा, धामणा, राजापूर, बादलापूर, कंचनपूर, आगर, कासली बुद्रूक, कासली खुर्द, म्हातोडी, घुसर, अलिमाबाद, अनकवाडी, दापुरा, मारोडी, एकलारा, खोबरखेड, आपातापा, आखतवाडा, शामाबाद, सुल्तान आजमपूर, आपोती बुद्रूक, आपोती खुर्द, अंबिकापूर, मजलापूर, जलालाबाद, गोणापूर, रामगाव, गोंदापूर, दहीगाव, पळसो खुर्द, धोतर्डी, सांगळूद खुर्द, वरोडी, वाकी, नावखेड, सांगळूद बुद्रूक, कौलखेड गोमासे, कौलखेड, लाखोंडा बुद्रूक, लाखोंडा खुर्द या गावांचा समावेश आहे. 

असा होईल पाणीपुरवठा..चोहोट्टा बाजार जवळ जलवाहिनीलगत पाण्याची टाकी बांधून तेथून ६0 हॉर्सपॉवरच्या पंपाद्वारे पाणी उचल करून उगवापर्यंत आणले जाईल. तेथून  ७ ते ८ कि.मी. च्या नवीन जलवाहिनीद्वारे घुसरपर्यंत पाणी नेले जाईल. तेथून टंचाईबाधित ४४ गावांना पाणी पुरवठा होणार आहे. 

टॅग्स :Wan Projectवान प्रकल्पakotअकोटTelharaतेल्हाराAkola Ruralअकोला ग्रामीण