शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला पाणीपुरवठा योजना ‘एमजीपी’कडे देण्यासाठी घेणार बैठक!

By admin | Updated: June 28, 2014 01:42 IST

डीपीसी’च्या सभेत पालकमंत्री राजेंद्र दर्डा यांची ग्वाही

अकोला : अकोला शहर पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडे (एमजीपी) हस्तांतरित करण्यासाठी मंत्रालयात पुढील आठवड्यात संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही राज्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र दर्डा शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) सभेत दिली.जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात पालकमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, आ.गोपीकिशन बाजोरिया, आ.रणजीत पाटील, आ.हरीष पिंपळे, आ. संजय गावंडे, वसंतराव खोटरे, जिल्हाधिकारी अरुण शिंदे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे, महापालिका आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, पोलिस उपअधीक्षक सुरेश खाटमोडे पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.शहरातील पाणीपुरवठा योजनेची स्थिती अत्यंत बिकट झाली असून, शहराला नियमीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी उपाययोजनांची गरज असल्याचा मुद्दा ह्यडीपीसीह्ण सदस्य तथा नगरसेवक सुनील मेश्राम यांनी उपस्थित केला. त्यानुषंगाने अकोला शहराची पाणीपुरवठा योजना ह्यएमजीपीह्णकडे सुपूर्द करणे अत्यंत आवश्यक असून, यासंदर्भात एमजीपीच्या संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करण्यात आली आहे. तसेच शहराची पाणीपुरवठा एमजीपीकडे सुपूर्द करण्याच्या विषयावर पुढील आठवड्यात मुंबई येथील मंत्रालयात संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.या सभेत समिती सदस्यांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. शेतकर्‍यांनी ८0 टक्के रक्कमेचा भरणा केल्यावरही कृषी पंपांचे जळालेले ट्रान्सफॉर्मर उशिरा दुरुस्त करुन बसविण्यात आले, त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाल्याचा मुद्दा आ.हरिष पिंपळे यांनी उपस्थित केला. कृषी पपांच्या वीज जोडणीबाबत प्रलंबित प्रकरणांसदर्भात आ.डॉ.रणजीत पाटील यांनी सभेत विचारणा केली. तसेच सोयाबीन आणि कपाशीचे उपलब्ध बियाणे आणि कृषी विभागामार्फत करण्यात आलेले नियोजन, याबाबतचा मुद्दा आ.संजय गावंडे आणि आ.डॉ.रणजीत पाटील यांनी उपस्थित केला. निधी उपलब्ध असूनही जिल्ह्यातील ४ हजार ७00 गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदत निधी वाटप का करण्यात आला नाही, असा प्रश्न माजी आमदार डॉ.जगन्नाथ ढोणे यांनी उपस्थित केला. जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी प्राप्त झालेला निधी वाटप करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी यावेळी दिली. दलितेतर योजनेंतर्गत महापालिकेच्या प्रस्तावाला जून्याच ह्यडीपीआरह्णनुसार मंजूरी देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक विजय अग्रवाल यांनी केली. तेल्हारा शहर हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून, या प्रस्तावाला मंजूरी देण्याची मागणी तेल्हारा नगरपालिका उपाध्यक्ष जयश्री मानखैर यांनी तर अकोला शहराच्या सर्वेसाठी मनपाला शासनाकडून निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी नगरसेविका उषा विरक यांनी या सभेत केली. या सभेला समितीचे सदस्य आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.