शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांचाही ‘पीएफ’चा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 13:23 IST

पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाºयांच्याही भविष्य निर्वाह निधीचा घोटाळा झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्दे भविष्य निर्वाह निधीची रक्कम वरिष्ठ कार्यालयात जमाच झाली नाही. रक्कम तब्बल १२ महिने संबंधित कार्यालयात पाठविण्यातच आलेली नाही. जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी कार्यालयाचे त्याकडे कमालीचे दुर्लक्ष आहे.

अकोला : बाळापूर पंचायत समितीमध्ये ४५० पेक्षाही अधिक शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीची १ कोटी २० लाख रुपये कपात करूनही ती वरिष्ठांकडे सादर न केल्याचा प्रकार घडला असताना, पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाºयांच्याही भविष्य निर्वाह निधीचा घोटाळा झाल्याची माहिती आहे. २०१५-१६ पासून हा प्रकार सुरू आहे. विशेष म्हणजे, त्याकडे वरिष्ठ कार्यालय असलेल्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी कार्यालयाचे कमालीचे दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट होत आहे.बाळापूर पंचायत समिती अंतर्गत कार्यरत कर्मचाºयांच्या वेतनातून दरमहा कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम वरिष्ठ कार्यालयात जमाच झाली नाही. फेब्रुवारी ते जुलै २०१८ दरम्यानची ही रक्कम १ कोटी २० लाख रुपये आहे. या प्रकरणात चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मारोती वरोकार यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकाºयांकडे केली. बाळापूर पंचायत समितीमध्ये सातत्याने हे प्रकार घडत आहेत. पाणी पुरवठा विभागाच्या २१ चतुर्थश्रेणी कर्मचाºयांवरही हा अन्याय झाला आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षातील चार हप्ते, तर २०१६-१७ या वर्षातील संपूर्ण हप्त्याची भविष्य निर्वाह निधीची कपात केलेली रक्कम तब्बल १२ महिने संबंधित कार्यालयात पाठविण्यातच आलेली नाही. त्यातीलच हप्ते अजूनही कर्मचाºयांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत. सोबतच पतसंस्था व इतर कपातीसंदर्भातही हे प्रकार घडत आहेत.त्यातून पाणी पुरवठा विभागाच्या चतुर्थश्रेणी कर्मचाºयांवर आर्थिक अन्याय केला जात आहे. भविष्य निर्वाह निधीच्या रकमेवर मिळणाºया व्याजापासून त्यांना वंचित ठेवण्यात येत आहे. कपात केलेली रक्कम जमा न करणे, हा मोठा आर्थिक घोटाळा असतानाही जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी कार्यालयाचे त्याकडे कमालीचे दुर्लक्ष आहे. सातत्याने घडत असलेल्या या प्रकरणी संबंधितांवर कारवाई न करता मोकाट सोडले जात असल्याने कर्मचाºयांवर अन्याय होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद