शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : ‘जीएमसी’मध्ये डॉक्टरांच्या उपस्थितीवर राहणार ‘वॉच!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:48 IST

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सेवा देणार्‍या डॉक्टरांच्या उपस्थितीवर आता प्रशासकीय ‘वॉच’ राहणार आहे. महाविद्यालय प्रशासनाने ‘बायोमेट्रिक’ मशीन बसविण्याचा निर्णय घेतला असून, येत्या काही दिवसांत ही प्रणाली कार्यान्वित होणार आहे.

ठळक मुद्देलवकरच येणार ‘बायोमेट्रिक’ प्रणाली 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सेवा देणार्‍या डॉक्टरांच्या उपस्थितीवर आता प्रशासकीय ‘वॉच’ राहणार आहे. महाविद्यालय प्रशासनाने ‘बायोमेट्रिक’ मशीन बसविण्याचा निर्णय घेतला असून, येत्या काही दिवसांत ही प्रणाली कार्यान्वित होणार आहे. अधिष्ठातांपासून सफाई कामगारापर्यंत सर्वच कर्मचारी या प्रणालीच्या कक्षेत येणार असल्यामुळे त्यांची ‘जीएमसी’मधील उपस्थितीचे प्रमाण सुधारण्यास मदत मिळणार आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात केवळ जिल्हाच नव्हे, तर लगतच्या जिल्हय़ांमधूनही रुग्ण उपचारासाठी येतात. येथील बाहय़ उपचार विभागात (ओपीडी) दररोज किमान १८00 ते २000 रुग्णांची तपासणी होते. तसेच या रुग्णालयात भरती होणार्‍या रुग्णांची संख्याही मोठी आहे. रुग्ण संख्या मोठी असली, तरी येथील कर्मचार्‍यांची संख्या त्या तुलनेत तोकडी आहे. रुग्णालयात डॉक्टर व इतर कर्मचारी वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी नेहमीच असतात. यावर उपाय म्हणून महाविद्यालय प्रशासनाने त्यांच्या आस्थापनेवर असलेल्या डॉक्टरांपासून ते सफाई कामगारांपर्यंतच्या सर्वच कर्मचार्‍यांच्या येण्या-जाण्याची नोंद ठेवण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यामधील नोंदीची सांगड कर्मचार्‍यांच्या वेतनाशी घालण्यात येणार आहे. ही प्रणाली बसविण्यासाठी आवश्यक असलेले वाय-फाय राऊटर व इतर सामग्रीसाठी निविदा बोलाविण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांमध्ये या बाबींची पूर्तता होऊन ‘जीएमसी’मध्ये बायोमेट्रिक मशीन बसविण्यात येणार आहे. अधिष्ठातापासून सफाई कामगारापर्यंतच्या सर्वच कर्मचार्‍यांना या मशीनमध्ये ‘थम्ब इम्प्रेशन’ करणे बंधनकारक असणार आहे.

‘एमबीबीएस’ विद्यार्थ्यांसाठीही करणार अनिवार्यपहिल्या टप्प्यात कर्मचार्‍यांसाठी बायोमेट्रिक प्रणाली लागू केल्यानंतर, लवकरच दुसर्‍या टप्प्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकणार्‍या ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्यांनाही ही  प्रणाली अनिवार्य करण्यात येणार आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची हजेरी वाढविण्यासाठी थेट वर्गात बायोमेट्रिक मशीन व सीसी कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विद्यार्थ्यांचा तासिकांना हजर राहण्याचा टक्का फारसा समाधानकारक नसल्यामुळे ही व्यवस्था करण्यात येणार आहे.

बायोमेट्रिक प्रणाली बसविण्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू असून, लवकरच तिचा प्रत्यक्ष वापर सुरू होईल. या प्रणालीमुळे पारदर्शकता वाढीस लागून, कर्मचार्‍यांची ‘जीएमसी’मधील उपस्थिती सुधारण्यासाठीही मदत होणार आहे. - डॉ. राजेश कार्यकर्ते, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला.

टॅग्स :Akola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयAkola cityअकोला शहर