शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Akola - Washim ZP Election : सत्ता स्थापनेसाठी संख्याबळाची जुळवाजुळव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 14:43 IST

अकोल्यात भारिप-बहुजन महासंघाला दोन सदस्यांची गरज असून, वाशिममध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला किमान दोन मित्रपक्षांना सोबत घ्यावे लागेल, अशी स्थिती आहे.

अकोला: अकोला आणि वाशिम जिल्हा परिषद निवडणुकीत कुण्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसून, सत्ता स्थापनेसाठी संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अकोल्यात भारिप-बहुजन महासंघाला दोन सदस्यांची गरज असून, वाशिममध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला किमान दोन मित्रपक्षांना सोबत घ्यावे लागेल, अशी स्थिती आहे.अकोला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारिप-बमसंला स्वतंत्रपणे सर्वाधिक २३ जागा मिळाल्या आहेत. भारिपला दोन बंडखोरांसह आणखी दोन सदस्यांची गजर आहे. दुसरीकडे भारिप-बमसंपाठोपाठ शिवसेनेला १३ जागा आहेत. महाविकास आघाडीचे घटक असलेल्या काँग्रेसकडे ४ तर राष्ट्रवादीकडे ३ जागा आहेत. ही आघाडी अस्तित्वात आल्यास सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या २७ च्या आकड्यासाठी सात सदस्यांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. ती सदस्य संख्या भाजपकडे आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत भारिप-बमसंला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे समीकरण दिसून येते. या चार पक्षांची आघाडी होणार की नाही, ही बाब सध्यातरी अशक्य दिसत आहे. राज्यातील सत्ता स्थापनेनंतर एकमेकांपासून कमालीची दुरावलेली भाजप-सेना जिल्हा परिषदेत एकत्र येईल, याची शक्यता किती, यावर नेतेही चूप आहेत. भाजप सोबत असताना काँग्रेस सहभागी होईल, याची शक्यताही तितकीच कमी असल्याचे चित्र सध्यातरी आहे.५२ सदस्य संख्या असलेल्या वाशिम जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी २७ संख्याबळ आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे १२, काँग्रेस ९, भारिप-बमसं ८, भाजप ७, वाशिम जिल्हा जनविकास आघाडी ७, शिवसेना ६, स्वाभिमानी शेतकरी संघटना १ व अपक्ष दोन असे पक्षीय बलाबल आहे. आता सत्ता स्थापनेसाठी २७ सदस्य संख्या आवश्यक असून, महाविकास आघाडीचे संख्याबळ २७ असे होते. दुसरीकडे जनविकास आघाडी तसेच भारिप-बमसंकडून राष्टÑवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याचीही चाचपणी सुरू आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाWashim ZPवाशीम जिल्हा परिषदAkola ZPअकोला जिल्हा परिषदZP Electionजिल्हा परिषद