लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिका प्रशासनाकडे थकीत मालमत्ता कराचा भरणा न करण्याचा प्रकार मालमत्ताधारकाच्या चांगलाच अंगलट आला. अडीच लाख रुपये कर जमा करण्यास टाळाटाळ करणार्या महेश मोतेवार यांच्या मालमत्तेला कुलूप लावण्याची कारवाई मंगळवारी मनपाच्या कर वसुली पथकाने केली. आळशी प्लॉट येथील रहिवासी महेश मोतेवार यांच्याकडे २ लाख ५0 हजार १५१ रुपये मालमत्ता कर थकीत होता. यासंदर्भात प्रशासनाने मोतेवार यांना नोटीस जारी करीत वारंवार सूचना दिल्या. मनपाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे मोतेवार यांना भोवले. मंगळवारी मनपाच्या जप्ती पथकाचे प्रमुख सै. मुमताज अली, सहा. कर अधीक्षक प्रशांत बोळे, प्रकाश कपले, शोभा इंगळे, शोभा पांडे यांनी मोतेवार यांच्या मालमत्तेला ‘सील’ लावण्याची कारवाई केली. अकोलेकरांनी त्यांच्याकडील थकीत मालमत्ता क राचा भरणा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अकोला : थकीत मालमत्ता कराचा भरणा न करण्याचा प्रकार आला अंगलट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 02:09 IST
अकोला : महापालिका प्रशासनाकडे थकीत मालमत्ता कराचा भरणा न करण्याचा प्रकार मालमत्ताधारकाच्या चांगलाच अंगलट आला. अडीच लाख रुपये कर जमा करण्यास टाळाटाळ करणार्या महेश मोतेवार यांच्या मालमत्तेला कुलूप लावण्याची कारवाई मंगळवारी मनपाच्या कर वसुली पथकाने केली.
अकोला : थकीत मालमत्ता कराचा भरणा न करण्याचा प्रकार आला अंगलट
ठळक मुद्देअडीच लाख रुपये कर जमा करण्यास टाळाटाळ महेश मोतेवार यांच्या मालमत्तेला कु लूप