लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भीम कायदा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत निंघोट यांची हत्या करणार्या आणखी दोन आरोपींना शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांच्या विशेष पथकाने गुरुवारी अटक केली. या प्रकरणातील आकाश सिरसाट व आशुल्या सिरसाट हे दोन आरोपी पोलीस कोठडीत असून, गुरुवारी अटक केलेल्या आरोपींमध्ये अश्विन सिरसाट, अंकुश सपकाळ या दोघांचा समावेश आहे.माधव नगरातील गजानन विहार अपार्टमेंटमधील रहिवासी प्रशांत सुखलाल निंघोट हे माजी आमदार राम पंडागळे यांच्या भीम कायदा संघटनेचे जिल्हाध्यक्ष होते. गुरुवार, १४ डिसेंबर रोजी रात्री १0 वाजताच्या सुमारास प्रशांत निंघोट घरी असताना भीम नगरातील रहिवासी आकाश ऊर्फ पव्या सिरसाट, आशिष ऊर्फ आशुल्या सिरसाट, प्रेमा सिरसाट, अंकुश सपकाळ यांच्यासह चार अनोळखी युवक त्यांच्या घरासमोर येऊन प्रशांत निंघोट यांना घराबाहेर घेऊन गेले. यावेळी प्रशांत निंघोट यांनी त्यांचा मित्र अमर इंगळे याला सोबत घेतले. रिंग रोडवरील पिल कॉलनीजवळ प्रशांत निंघोट व अमर इंगळे या दोघांसोबत आकाश सिरसाट, आशुल्या सिरसाट, प्रेमा, अंकुश व इतर चार युवकांनी वाद घातला. या वादातून सदर आरोपींनी निंघोट व इंगळे यांच्यावर चाकूने हल्ला केला. यामध्ये प्रशांत निंघोट यांचा जागेवरच मृत्यू झाला तर अमर इंगळे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर आरोपी फरार झाले; मात्र पोलिसांनी आकाश सिरसाट, आशुल्या सिरसाट या दोघांना अटक केली. त्यानंतर गुरुवारी अश्विन सिरसाट व अंकुश सपकाळ या दोन आरोपींना अटक केली असून, अटकेतील आरोपींची संख्या चार झाली आहे. फरार असलेल्या चार अज्ञात आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. अटकेतील चारपैकी आकाश सिरसाट, आशुल्या सिरसाट या दोघांना न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अकोला : प्रशांत निंघोट खुनातील आणखी दोन आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 02:39 IST
अकोला : भीम कायदा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत निंघोट यांची हत्या करणार्या आणखी दोन आरोपींना शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांच्या विशेष पथकाने गुरुवारी अटक केली.
अकोला : प्रशांत निंघोट खुनातील आणखी दोन आरोपी अटकेत
ठळक मुद्देचार गजाआडअनोळखी चार जण अद्यापही फरार