शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Akola: पोलिस असल्याची बतावणी करून दोघांनी वृद्धास लुटले! पणज गावाजवळील घटना

By नितिन गव्हाळे | Updated: July 14, 2023 08:30 IST

Akola: दुचाकीवरून आलेल्या दोघांनी वृद्धाकडील सोन्याच्या प्रत्येकी पाच ग्रॅमच्या दोन अंगठ्या लांबवल्याची अकोट-अंजनगाव रोडवरील पणज गावाजवळ घडली. याप्रकरणात अकोट ग्रामिण पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

- नितीन गव्हाळेअकोला - अकोल्यात साडुच्या मुलाचे लग्न आटोपून अकोटला मुक्काम केल्यानंतर १२ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अचलपुरला दुचाकीने जाणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला अडवून पोलिस असल्याची बतावणी केली आणि पुढे खून झाला असून, तुमच्याकडील अंगठ्या काढून खिशात ठेवा. असे सांगुन वृद्धाकडील सोन्याच्या प्रत्येकी पाच ग्रॅमच्या दोन अंगठ्या लांबवल्याची अकोट-अंजनगाव रोडवरील पणज गावाजवळ घडली. याप्रकरणात अकोट ग्रामिण पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

अचलपुरातील अब्बासपुरा येथे राहणारे सेवानिवृत्त कर्मचारी नथ्थुजी संपतराव केचे(७२) यांच्या तक्रारीनुसार १० जुलै रोजी त्यांच्या साडुच्या मुलाचे अकोल्यात लग्न होते. त्यासाठी अचलपुरवरून ते दुचाकीने अकोटला आले. तेथून अकोल्यातील लग्न समारंभ आटोपून ११ जुलै रोजी सकाळी अकोटला गेले. याठिकाणी साळ्याकडे त्यांनी मुक्काम करून १२ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास ते दुचाकीने अचलपुरकडे जाण्यास निघाले. दरम्यान मागाहून दुचाकीवर रेनकोट घातलेले दोन इसम आले. त्यांनी नथ्थुजी केचे यांना अडवून पोलिस असल्याचे सांगितले आणि अकोट येथे खून झाला असून, आरोपींनी त्यांच्याकडील सोन्याचे दागिने हिसकावून घेतल्याची बतावणी केली.

तसेच तुमच्याकडील अंगठ्या, घड्याळ काढून द्या आणि खिशात ठेवा. असे सांगितले आणि त्यातील एकाने माझ्याकडील दोन अंगठ्या, घड्याळ घेत, रूमालात बांधून दिला आणि खिशात ठेवण्यास सांगितला. त्यानंतर नथ्थुजी केचे यांनी काही अंतरावर गेल्यानंतर रूमाल उघडून पाहिला असता, घड्याळाव्यतिरिक्त त्यात काहीच नव्हते. पोलिस असल्याची बतावणी करून दोघांनी लुटल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अकोट ग्रामिण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोला