शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अकोला : दोन किलो सोने लुटणार्‍यांची पोलीस कोठडीत रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 01:40 IST

अकोला : शहरातील सराफा व्यावसायिकांचे कुरियर बॉयने आणलेले १६ लाख १५ हजार रुपयांचे दोन किलो सोन्याचे दागिने ८ फेब्रुवारी २0१७ रोजी लुटमार करणार्‍या चार चोरट्यांना रामदास पेठ पोलिसांनी सोमवारी रात्री अकोल्यात आणले. त्यांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

ठळक मुद्देचारही आरोपींना आणले अकोल्यातरामदासपेठ पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील सराफा व्यावसायिकांचे कुरियर बॉयने आणलेले १६ लाख १५ हजार रुपयांचे दोन किलो सोन्याचे दागिने ८ फेब्रुवारी २0१७ रोजी लुटमार करणार्‍या चार चोरट्यांना रामदास पेठ पोलिसांनी सोमवारी रात्री अकोल्यात आणले. त्यांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. नाम खरगयाल, बिरजू चहादे, विनय भोयर व लक्ष्मण पाटील असे या चार आरोपींची नावे आहेत. ठाणे पेालिसांनी घरफोड्या व मोठय़ा चोर्‍या तसेच लुटमार करणार्‍या एका टोळीला अटक केली होती. या टोळीतील चौघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी अकोल्यातील दोन किलो सोने लुटमार प्रकरणात सहभागी असल्याची कबुली दिली होती. त्यांच्या अटकेसाठी रामदास पेठ पोलिसांचे पथक शनिवारी ठाण्यासाठी रवाना झाले होते. या चोरट्यांनी प्रशांत कुरियरचे संचालक प्रशांत शहा यांच्या कुरियर सर्व्हिसमध्ये आदर्श कॉलनी येथील रहिवासी हिंमत आनंदराव काकडे हा कुरियर बॉय ८ फेब्रुवारीच्या पहाटे अकोला रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर त्यांनी रेल्वे स्थानकाच्या वाहनतळातील स्वत:ची दुचाकी क्रमांक एम एच ३0 एन ४४९२ काढल्यानंतर समोरील चौकात आले. यावेळी पोलीस चौकीजवळ दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी काकडे यांच्याकडील १६ लाख १५ हजार रुपयांच्या दोन किलो सोन्याच्या दागिन्यांची बॅग लंपास केली होती. हा प्रकार झाला तेव्हा हिंमत काकडे यांनी आरडाओरड न करता शहा हॉस्पिटलसमोर असलेल्या त्यांच्या मालकाकडे धाव घेतली होती. याप्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३९४ नुसार गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला; मात्र जवळपास एक वर्षाचा कालावधी उलटत असतानाही चोरट्यांचा शोध लागत नसल्याने पोलिसांनी या चोरट्यांची माहिती देणार्‍यांना ५0 हजारांचे बक्षीस जाहीर केले होते; मात्र त्यानंतरही अकोला पोलिसांना यश आले नाही. दरम्यान, ठाणे पोलिसांनी या चोरट्यांना पकडल्यानंतर रामदास पेठ पोलिसांना माहिती दिली. ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या नाम खरगयाल, बिरजू चहादे, विनय भोयर व लक्ष्मण पाटील या चार चोरट्यांनी ही चोरी केल्याची क बुली दिली. रामदास पेठ पोलिसांनी या चोरट्यांना अटक केली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरArrestअटकCrimeगुन्हा