लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुविधेसाठी राज्यभरात शिवशाही सेवा सुरू केली. मात्र, या शिवशाहीला सातत्याने संकटाचा सामना करावा लागत आहे. शिवशाहीवर सातत्याने टीका होत असताना, अकोल्यातील बायपास मार्गावर पुणे-अकोला गाडी एअरलॉकमुळे बंद पडली. प्रवाशांना येथेच उतरावे लागले. सकाळपासून अनेक तास शिवशाही चौकात नादुरूस्त अवस्थेत उभी असल्याने रविवारी शिवशाही लक्षवेधी ठरली.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने लांब पल्ल्याच्या गाड्या बंद करून शिवशाहीचा नवीन प्रकल्प आणला. यासाठी शेकडो नवीन गाड्या आणि नवीन करार केला गेला. त्यावर अजूनही परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यावर टीका सुरूच आहे. राज्यात शिवशाही धावत असताना अकोल्याच्या वाट्यालाही आधी दोन, नंतर अलीकडेच आणखी एक, अशा एकूण तीन गाड्या आल्यात. पुणे- अकोला आणि अकोला-पुणे या तीन गाड्या आता अकोला आगार क्रमांक दोनमधून धावत आहेत. रविवारी अकोल्यात येणारी एमएच ४६ बीबी ५४४३ क्रमांकाची पुणे-अकोला शिवशाही पोहोचली. मात्र, बायपासजवळच्या खासगी लक्झरी स्टॅन्डजवळ अचानक त्यामध्ये बिघाड झाला. त्यामुळे प्रवाशांना येथेच उतरावे लागले. शिवशाहीच्या देखभालीची जबाबदारी खासगी व्यवस्थेकडे असल्याने चालकांनी कंपनीच्या व्यवस्थापनास कॉल करून घटनास्थळावर बोलाविले. अनेक तास कंपनीचे मॅकेनिक घटनास्थळावर न पोहोचल्याने शिवशाही बायपास मार्गावर अकोलेकरांचे लक्ष वेधून घेत होती. याबाबत एसटी मंडळाच्या अधिकार्यांना विचारणा केली असता, त्यांनी एअरलॉक झाल्याने शिवशाही बंद पडली होती, असे सांगितले. नवीन गाड्यांमध्ये डीझल सेंसर असून, चालक बदलला की ही स्थिती निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
अकोला : परिवहन महामंडळाची ‘शिवशाही’ झाली ‘एअरलॉक’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 02:42 IST
अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुविधेसाठी राज्यभरात शिवशाही सेवा सुरू केली. मात्र, या शिवशाहीला सातत्याने संकटाचा सामना करावा लागत आहे. शिवशाहीवर सातत्याने टीका होत असताना, अकोल्यातील बायपास मार्गावर पुणे-अकोला गाडी एअरलॉकमुळे बंद पडली.
अकोला : परिवहन महामंडळाची ‘शिवशाही’ झाली ‘एअरलॉक’!
ठळक मुद्देशिवशाहीला सातत्याने संकटाचा सामना करावा लागत आहेअकोल्यातील बायपास मार्गावर पुणे-अकोला गाडी एअरलॉकमुळे बंद पडलीप्रवाशांना येथेच उतरावे लागले