शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
3
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
4
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
5
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
6
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
7
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
8
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
9
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
10
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
11
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
12
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
13
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
14
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
15
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
16
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
17
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
18
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
19
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
20
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका

अकोला : शौचालयांचे ऑडिट, बांधकामाची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 01:31 IST

मनपा क्षेत्रात आतापर्यंत १८ हजार १३७ शौचालयांची उभारणी करण्यात आली असून, त्यांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करण्याचा निर्णय केंद्र व राज्य शासनाने घेतला आहे. त्या पृष्ठभूमीवर शनिवार, २३ डिसेंबर रोजी केंद्र शासनाची चमू अकोल्यात दाखल होणार असल्याची माहिती आहे. 

ठळक मुद्देमहापालिका क्षेत्रात १८ हजार १३७ शौचालयांचे बांधकाम

आशिष गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रात बांधण्यात आलेली सार्वजनिक स्वच्छतागृहे, वैयक्तिक शौचालये केंद्र सरकारच्या रडारवर आली आहेत. शौचालयांच्या उभारणीसाठी केंद्र व राज्य शासनाने प्रत्येकी सहा हजार रुपये, असे प्रति लाभार्थी एकूण १२ हजार रुपये अनुदान देण्यात आले होते. मनपा क्षेत्रात आतापर्यंत १८ हजार १३७ शौचालयांची उभारणी करण्यात आली असून, त्यांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करण्याचा निर्णय केंद्र व राज्य शासनाने घेतला आहे. त्या पृष्ठभूमीवर शनिवार, २३ डिसेंबर रोजी केंद्र शासनाची चमू अकोल्यात दाखल होणार असल्याची माहिती आहे. केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानच्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात आले. २ ऑक्टोबर २0१७ पर्यंत राज्यातील शहरांना हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले होते. त्यानुषंगाने महापालिका, नगर परिषद व नगरपंचायतींमध्ये सार्वजनिक शौचालयांसह वैयक्तिक शौचालयांचे मोठय़ा प्रमाणात बांधकाम करण्यात आले. वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी पात्र लाभार्थीला केंद्र शासनाकडून सहा हजार रुपये व राज्य शासनाकडून सहा हजार, असे एकूण १२ हजारांचे अनुदान देण्यात आले. १२ हजार रुपयांमध्ये दज्रेदार वैयक्तिक शौचालय उभारणे लाभार्थींना शक्य नसल्यामुळे अकोला महापालिकेच्या तत्कालीन महापौर उज्ज्वला देशमुख यांनी मनपा निधीतून तीन हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १५ हजार रुपयांत मनपा क्षेत्रात १८ हजार १३७ वैयक्तिक शौचालयांची उभारणी करण्यात आली. यासाठी २९ कोटी २५ लक्ष ५५ हजार रुपये निधी खर्च झाला. शहराला हगणदरीमुक्त करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात शौचालयांची उभारणी केली असली, तरी त्यांचा दर्जा राखला गेला की नाही, यावर केंद्र व राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने निरीक्षण नोंदविल्याची माहिती आहे. त्या पृष्ठभूमीवर शौचालयांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करण्यासह बांधकामाची तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाची द्विसदस्यीय चमू शनिवार, २३ डिसेंबर रोजी अकोला शहरात दाखल होत आहे.

एक महिन्यांपासून ‘गुड मॉर्निंग’ पथके बंदशहरात वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम केल्यानंतरही काही नागरिक उघड्यावर शौचास बसत असल्याचे निदर्शनास येताच महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी झोन अधिकारी, आरोग्य निरीक्षक व महिला बचत गटांची ‘गुड मॉर्निंग’ पथके कार्यान्वित केली होती. रेल्वे रुळालगत, नदीकाठी तसेच झोपडपट्टी भागात पहाटे ५ वाजतापासून पथकांच्या माध्यमातून नागरिकांना उघड्यावर शौच करण्यास मज्जाव करण्यासह जनजागृती करण्याची मोहीम सुरू केली होती. अजय लहाने यांची बदली होताच मनपाची ‘गुड मॉर्निंग’ पथके बंद झाली, हे येथे उल्लेखनीय. सार्वजनिक शौचालयांचीसुद्धा दुरवस्था झाली आहे. 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान