शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : शास्ती अभय योजनेसाठी तीन दिवसांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 01:48 IST

अकोला : शहरातील मालमत्ताधारकांना थकीत कर जमा करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत शास्ती अभय योजनेचा लाभ घेता येणार आहे.  २0१६-१७ मधील थकीत मालमत्ता कराची रक्कम जमा केल्यास मालमत्ताधारकांना शास्तीच्या आकारणीतून सूट मिळणार असून, त्यासाठी केवळ तीन दिवसांची मुदत बाकी आहे.

ठळक मुद्देमालमत्ता करावर शास्तीच्या आकारणीतून मिळणार सूट

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील मालमत्ताधारकांना थकीत कर जमा करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत शास्ती अभय योजनेचा लाभ घेता येणार आहे.  २0१६-१७ मधील थकीत मालमत्ता कराची रक्कम जमा केल्यास मालमत्ताधारकांना शास्तीच्या आकारणीतून सूट मिळणार असून, त्यासाठी केवळ तीन दिवसांची मुदत बाकी आहे. त्यानंतर प्रशासनाने थकीत करावर शास्तीची आकारणी लागू केल्यास संबंधितांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे थकीत मालमत्ता कराचा भरणा तातडीने करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे. महापालिका प्रशासनाने दर तीन वर्षांनंतर शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करणे अपेक्षित असताना १९९८ ते २0१६ पर्यंत पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया झालीच नाही. १८ वर्षांच्या कालावधीत शहरात नव्याने किती मालमत्तांचे निर्माण झाले, याचा प्रशासनाच्या मालमत्ता कर विभागाकडे कोणताही लेखाजोखा उपलब्ध नव्हता. कर वसुली लिपिकांच्या जुजबी आकडेवारीनुसार प्रशासनाच्या दप्तरी ७२ हजार मालमत्तांची नोंद होती. मालमत्तांचे पुनर्मूल्यांकनच नसल्यामुळे त्यापासून मिळणारे उत्पन्न अवघे १६ ते १८ कोटी रुपये होते. मनपाच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या कर वसुली विभागाला घरघर लागल्यामुळे प्रशासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला. उत्पन्न वाढीसाठी शासनाचे निर्देश लक्षात घेता मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी मालमत्ता कराच्या रकमेत वाढ करण्यासाठी ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे मालमत्तांच्या पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण केली. यादरम्यान, ३१ हजार मालमत्ताधारकांना कर आकारणी झाली नसल्याचे उघड झाले. 

१ लाख ५२ हजार २३0 मालमत्तांची नोंदमहापालिका प्रशासनाने केलेल्या ‘जीआयएस’ सर्व्हेदरम्यान नवीन प्रभाग वगळून शहरात १ लाख ४ हजार २३0 मालमत्तांची नोंद झाली होती. त्यानंतर नवीन प्रभागात सर्वेक्षण केले असता ४८ हजार मालमत्तांची नोंद करण्यात आली. आजरोजी १ लाख ५२ हजार २३0 मालमत्तांची अधिकृत नोंद झाली असून, प्रशासनाने सुधारित दरानुसार कर आकारणी केल्यानंतर तिजोरीत ६२ कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा होईल. आजपर्यंत अत्यल्प कर जमा करणार्‍या नागरिकांनी थकीत कराचा भरणा करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. 

काय आहे अभय योजना?२0१६-१७ या कालावधीत ज्या नागरिकांक डे मालमत्ता कर थकीत आहे, त्यांच्यासाठी महापालिकेने ३१ जानेवारीपर्यंत शास्ती अभय योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या मुदतीत नागरिकांनी थकीत मालमत्ता व पाणी पट्टी कर जमा केल्यास त्यांना शास्तीचा अतिरिक्त भुर्दंड भरावा लागणार नाही. ३१ जानेवारीनंतर संबंधित मालमत्ताधारकांवर शास्तीची आकारणी केली जाणार आहे. शास्ती लागू झाल्यास नागरिकांच्या मालमत्ता कर आकारणीत मोठी वाढ होणार आहे.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिका