लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रिंग रोडवरील समता कॉलनीमध्ये एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्डय़ावर खदान पोलिसांनी मंगळवारी धाड टाकू न दोन इसमांसह चार महिलांना अटक केली. या महिला, सुरेश गांधी, त्याची पत्नी व ग्राहक प्रवीण रामदास वानखडे या तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीनही आरोपींची कारागृहात रवानगी केली, तर महिलांची आदर्श महिला सुधारगृहात रवानगी केली. समता कॉलनीतील एक आलिशान बंगला सुरेश राधाकिसन गांधी याने भाड्याने घेतला होता. सदर बंगल्यात गांधी त्याच्या दुसर्या पत्नीच्या मदतीने तीन महिलांकडून देहव्यापार करीत असल्याची माहिती खदान पोलिसांना मिळाली. खदान पोलिसांनी या देहव्यापार अड्डय़ावर पाळत ठेवून मंगळवारी एक फंटर ग्राहक आणि त्याच्यासोबत एका पोलीस कर्मचार्यास ग्राहक म्हणून पाठवून या देहविक्री गोरखधंद्याचा पर्दाफाश केला. या ठिकाणावरून सुरेश राधाकिसन गांधी, एलआयसी ऑफिसचा प्रवीण रामदास वानखडे रा. राम नगर आणि चार महिलांना ताब्यात घेतले. यामधील एक महिला सुरेश गांधीची दुसरी पत्नी असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. उर्वरित तीन महिलांकडून जबरदस्तीने हा गोरखधंदा चालविण्यात येत असल्याचेही उघड झाले. खदानचे ठाणेदार संतोष महल्ले यांनी सुरेश गांधी, प्रवीण वानखडे व एका महिलेसह गोरखधंद्यात सहभागी असलेल्या तीन महिलांना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने गांधी, महिला व वानखडे या तिघांची कारागृहात रवानगी केली असून, उर्वरित तीन महिलांना आदर्श महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
अकोला : देहविक्री प्रकरणातील तीनही आरोपी कारागृहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 01:41 IST
अकोला : रिंग रोडवरील समता कॉलनीमध्ये एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्डय़ावर खदान पोलिसांनी मंगळवारी धाड टाकू न दोन इसमांसह चार महिलांना अटक केली.
अकोला : देहविक्री प्रकरणातील तीनही आरोपी कारागृहात
ठळक मुद्देरिंग रोडवरील समता कॉलनीमध्ये एका आलिशान बंगल्यात सुरू होता देहव्यापारतीन आरोपींची कारागृहात रवानगी