शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या तीन हजार रुपयांसाठी अकोलेकर तहानलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 13:55 IST

अकोला: ‘अमृत’ योजनेंतर्गत न्यू तापडिया नगर, खरप, डुबे वाडी, पंचशील नगरपर्यंत जलवाहिनीचे जाळे टाकण्यासाठी रेल्वे मार्ग ओलांडण्याची गरज निर्माण झाली आहे.

अकोला: ‘अमृत’ योजनेंतर्गत न्यू तापडिया नगर, खरप, डुबे वाडी, पंचशील नगरपर्यंत जलवाहिनीचे जाळे टाकण्यासाठी रेल्वे मार्ग ओलांडण्याची गरज निर्माण झाली आहे. हा मार्ग ओलांडण्यासाठी भूमिगत जलवाहिनीचा पर्याय असून, रेल्वे प्रशासनाच्या परवागीसाठी आॅनलाइन अर्ज सादर करावा लागतो. अर्ज सादर करण्यासाठी मनपा प्रशासनाकडे शुल्कापोटी तीन हजार रुपये नसल्यामुळे की काय, ‘अमृत’च्या कामाला खीळ बसली आहे. परिणामी, अवघ्या तीन हजार रुपयांसाठी शहरवासी तहानलेले असल्याचे चित्र समोर आले आहे.‘अमृत’ योजनेच्या माध्यमातून संपूर्ण शहरात जलवाहिनीचे जाळे टाकल्या जात आहे. त्यामध्ये जलकुंभाची उभारणी करण्यासह नागरिकांच्या घरापर्यंत जलवाहिनीचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक तीन अंतर्गत येणाऱ्या न्यू तापडिया नगर, खरप, डुबे वाडी, पंचशील नगर भागात जलवाहिनीचे जाळे नाही. हातपंपांच्या पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त असल्याने ते पिण्यायोग्य नसल्याची परिस्थिती आहे. अशा स्थितीत नागरिकांना पिण्यासाठी विकत पाणी घ्यावे लागते. ‘अमृत’च्या माध्यमातून जलवाहिनीचे जाळे टाकल्या जात असल्याने प्रभाग तीनमधील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. यादरम्यान, रेल्वे मार्ग ओलांडून भूमिगत पद्धतीने जलवाहिनीचे जाळे टाकण्यासाठी रेल्वे प्रशासनाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे आॅनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी तीन हजार रुपये शुल्क जमा करावे लागते. अशाप्रमाणे किमान पाच ते सहा ठिकाणी भूमिगत जलवाहिनीचे जाळे टाकावे लागेल. सदर कामासाठी मनपा प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वी जलप्रदाय विभागात सेवानिवृत्त शाखा अभियंता डी. के. राऊत यांच्याकडे जबाबदारी दिली होती; परंतु ‘अमृत’च्या कामात शुल्क भरण्याची तरतूद नसल्याची सबब पुढे करून आजपर्यंतही रेल्वे प्रशासनाकडे अर्ज सादर करण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी, प्रभाग तीनमधील नागरिकांपर्यंत जलवाहिनीचे जाळे पोहोचू शकत नसल्याचे चित्र आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी तातडीने दखल घेण्याची मागणी भारिप-बमसंच्या गटनेत्या अ‍ॅड. धनश्री देव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.अर्ज सादर करण्यास विलंबभूमिगत पद्धतीने रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे अर्ज सादर केल्यानंतर परवानगीसाठी किमान ५ ते ६ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. सदर अर्ज सादर करण्यासाठी जलप्रदाय विभागाकडून जाणीवपूर्वक विलंब होत असल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका