शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : किन्नर संमेलनामध्ये होतेय नवीन नात्यांची गुंफण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:48 IST

अकोला : दामले चौकातील मौलाना अबूल कलाम आझाद सभागृहामध्ये १ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या अखिल भारतीय मंगलामुखी किन्नर संमेलनामध्ये देशभरातील कानाकोपर्‍यातून किन्नर बांधव सहभागी झाले आहेत. या संमेलनामध्ये दररोज सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच विविध प्रांतातून आलेल्या किन्नरांमध्ये विचारांच्या आदानप्रदानासह नवीन नात्यांची गुंफण होत आहे.

ठळक मुद्देअ.भा. मंगलामुखी किन्नर संमेलन: भव्य कलश यात्रा आज

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दामले चौकातील मौलाना अबूल कलाम आझाद सभागृहामध्ये १ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या अखिल भारतीय मंगलामुखी किन्नर संमेलनामध्ये देशभरातील कानाकोपर्‍यातून किन्नर बांधव सहभागी झाले आहेत. या संमेलनामध्ये दररोज सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच विविध प्रांतातून आलेल्या किन्नरांमध्ये विचारांच्या आदानप्रदानासह नवीन नात्यांची गुंफण होत आहे. सोमवारी संमेलनात बहीण मानण्याचा कार्यक्रम पार पडला. यात अकोल्याची आशाबाई, सिमरन (अम्माजी), बर्‍हाणपूरच्या शकीलाबाई, बालाघाटची रूपा नायक यांना बहिणींच्या नात्याने स्वीकारले. संमेलनामध्ये मंगळवारी शहरातून भव्य कलश यात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेची सुरुवात मौलाना अबूल कलाम आझाद सभागृहातून होईल, पवित्र गंगाजलाने भरलेल्या कलशाची यात्रा दामले चौक, अकोट स्टँड, टिळक रोड, कोतवाली चौक, गांधी रोड, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह, रफी अहमद किदवई मार्गाने निघणार असून, मौलाना अबूल कलाम आझाद सभागृहात शोभायात्रेचा समारोप होईल. किन्नर संमेलनामध्ये देशातील सर्वच राज्यातून किन्नर बांधव सहभागी झाले आहेत. संमेलनाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये विचार,  संस्कृतीचे आदानप्रदान होत आहे. संमेलनामध्ये मातेची अखंड ज्योत प्रज्वलित असून, सर्व पंथाचे, धर्माचे लोक या ठिकाणी अखंड ज्योतीचे दर्शन घेऊ शकतात. सकाळी ६ ते ९ आणि दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत दर्शनासाठी वेळ देण्यात आली आहे. 

किन्नर कल्याण बोर्डाच्या स्थापनेमुळे आनंदराज्य शासनाने किन्नर कल्याण बोर्डाची स्थापना केल्यामुळे संमेलनामध्ये सहभागी झालेल्या किन्नर बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. संमेलनामध्ये राज्य शासनाच्या अभिनंदनाचा प्रस्तावदेखील किन्नर बांधवांनी पारित केला. 

पालकमंत्र्यांनी साधला संवादपालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी किन्नर संमेलन स्थळाला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला यावेळी किन्नरांच्या समस्याबाबत माहिती घेतली. संमेलनाच्या आयोजीत विविध कार्यक्रमाच्या संदर्भात त्यांनी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. अशोक ओळंबे, महापौर विजय अग्रवाल आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :Akola cityअकोला शहर