शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात जय श्रीरामच्या जयघोषाने आसमंत निनादला

By नितिन गव्हाळे | Updated: April 17, 2024 20:47 IST

दिमाखात निघाली शोभायात्रा: आकर्षक चित्ररथांसह श्रीरामाच्या वेशभुषा केलेल्या बालकांनी वेधले लक्ष.

अकोला: दिंडी, भगवे ध्वज, अश्व आणि वाजतगाजत, फटाक्यांच्या आतषबाजीत राजराजेश्वर नगरीतून निघालेल्या भव्य शोभायात्रेत जय जय श्रीरामच्या जयघोषाने आसमंत निनादून गेला होता. ढोल-ताशांचा गजर, टाळ मृदंगाचा नाद, रस्त्यांवर रंगीबेरंगी रांगोळी आणि हजारोंच्या कंठातून निनादत असलेल्या जय श्रीरामच्या जयघोषाने राजराजेश्वर नगरी १७ एप्रिल रोजी रोजी राममय होऊन न्हाऊन निघाली. श्रीराम नवमी शोभायात्रा उत्सव समिती व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सायंकाळी राजराजेश्वर मंदिरातून ढोल-ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली.

प्रारंभी ग्रामदैवत राजराजेश्वर मंदिरात सर्वसेवाधिकारी कृष्णा गोवर्धन शर्मा, श्रीराम नवमी शोभायात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष शैलेष खरोटे, भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अभय पाटील, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार हरीश पिंपळे, विजय अग्रवाल, माजी गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, रा. स्व. संघाचे विभाग संघचालक प्रा. नरेंद्र देशपांडे, गणेश काळकर, राहुल राठी, राजेश मिश्रा, गिरीश जोशी भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, जयंत मसने, वसंत बाछुका आदींच्या उपस्थितीत महाआरती करून राजराजेश्वर मंदिरातून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. आकर्षक चित्ररथांनी वेधले लक्षशोभायात्रेमध्ये हजारो रामभक्तांसह विविध सामाजिक, धार्मिक संस्थांचे संदेश देणारे चित्ररथ सहभागी झाले होते. शोभायात्रेत थोर पुरुषांची आकर्षक वेशभूषा केलेली घोड्यांवरील चिमुकली मुले, मुली लक्ष वेधून घेत होते. शोभायात्रेत सहभागी रामभक्तांच्या गळ्यामध्ये केशरी दुपट्ट्यांनी वातावरण भगवेमय करून टाकले होते. शोभायात्रेच्या अग्रस्थानी अश्व, भजनी मंडळ आणि राम दरबाराची पालखी होती.

टॅग्स :Akolaअकोला