- रवी दामोदर अकोला - बार्शीटाकळी तालुक्यातील चोहोगाव येथील ७० वर्षीय वृद्ध इसमाच्या अंगावर घराची भिंत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना ७ जुलै रोजी सकाळच्या दरम्यान घडली. देवमन जयराम इंगळे असे मृतकाचे नाव असून ते घरासमोर उभे असता असताना समोरील देवराव इंगळे यांचे घराची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली .त्यांना भिंतीखाली दबलेल्या अवस्थेत बाहेर काढण्यात आले व त्वरित धाबा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेने अकोला येथे जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला .चोहोगाव सायखेड शिवारात दोन दिवसापासून सततधार पाऊस सुरू असून या पावसामुळे सदर भिंत कोसळल्याने देवमन इंगळे यांचा मृत्यू झाला .याप्रकरणी तलाठी सचिन कुमार म्हैसने यांनी घटनेचा प्राथमिक अहवाल तहसील कार्यालय बार्शीटाकळी येथे सादर केला आहे . मृतकाचे पश्चात पत्नी ,दोन मुले आहेत.
Akola: घराची भिंत अंगावर पडल्याने वृद्ध इसमाचा मृत्यू! बार्शीटाकळी तालुक्यातील चोहोगाव येथील घटना
By रवी दामोदर | Updated: July 8, 2023 12:51 IST