शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

अकोला : शहरात नव्याने टाकण्यात येणार्‍या जलवाहिनीची ‘टेस्टिंग’; पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 01:33 IST

अकोला : शहरात नव्याने टाकण्यात येणार्‍या जलवाहिन्यांची ‘टेस्टिंग’ घेतली जात असली, तरी संबंधित कंत्राटदार, त्यावर देखरेख ठेवणारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची यंत्रणा व मनपाच्या जलप्रदाय विभागाच्या दुर्लक्षामुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र केशव नगरासह अनेक ठिकाणी  दिसून येत आहे.

ठळक मुद्देशहरावर जलसंकटाचे सावट; अकोलेकर ‘बेपर्वा’

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरात नव्याने टाकण्यात येणार्‍या जलवाहिन्यांची ‘टेस्टिंग’ घेतली जात असली, तरी संबंधित कंत्राटदार, त्यावर देखरेख ठेवणारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची यंत्रणा व मनपाच्या जलप्रदाय विभागाच्या दुर्लक्षामुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र केशव नगरासह अनेक ठिकाणी  दिसून येत आहे. महान धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असून, शहरावर जलसंकटाचे सावट असल्याची जाणीव असतानासुद्धा प्रशासकीय यंत्रणेसोबतच अकोलेकरदेखील पाण्याच्या नासाडीबाबत कमालीचे बेपर्वा असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. केंद्र व राज्य शासनाने मंजूर केलेल्या ‘अमृत’ योजनेंतर्गत शहरात जलवाहिन्यांचे नवीन जाळे, जलकुंभ उभारण्याचे काम सुरू झाले आहे. सदर कामाचा कंत्राट ‘एपी अँण्ड जीपी’ कंपनीकडे असून, कंपनीच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी शासनाने तांत्रिक सल्लागार म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नियुक्ती केली आहे. योजनेच्या एकूण किमतीच्या बदल्यात एमजेपीला तीन टक्के रक्कम अदा केली जाणार आहे. शासनाने एमजेपीवर जबाबदारी निश्‍चित केली असली, तरी प्रत्यक्षात जलवाहिन्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यात शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे दिसत आहे. त्याचा परिणाम म्हणून की काय, जुन्या जलवाहिन्यांच्या बाजूला नवीन जलवाहिनी टाकल्यानंतर नागरिकांना दिल्या जाणार्‍या कनेक्शनमधून दाबाने पाणी पुरवठा होतो किंवा नाही, याची चाचपणी घेतली जात असताना पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर अपव्यय होत आहे. ऐन उन्हाळ्य़ाच्या दिवसांत पाण्याचे धो-धो लोट वाहत असल्यामुळे या नासाडीला जबाबदार कोण, या प्रकाराला महापालिका प्रशासन आळा घालेल का, असा सवाल उपस्थित होत आहे.

नासाडीची काळजी का नाही?निसर्गनिर्मित असणारे पाणी कृत्रिमपणे तयार करण्याचा अद्यापही शोध लागला नाही, याची जाणीव सर्वांनी ठेवण्याची गरज आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. परिणामी नागरिकांना किमान दोनशे ते चारशे फूट खोलपर्यंत बोअर खोदाव्या लागत आहेत. नवीन जलवाहिनीचे कनेक्शन उघडे असले तरी त्याला तोटी लावता येणे सहज शक्य आहे. प्रशासनाला दोष देण्यापेक्षा अकोलेकरांनाही पाण्याच्या नासाडीची काळजी नसावी, याबद्दल खेद व्यक्त केला जात आहे. 

दक्षिण झोनसह पूर्व झोनमध्ये जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचते किंवा नाही, यासाठी ‘टेस्टिंग’ घेतली जात आहे. त्यामध्ये बहुतांश वेळा टॅँकरद्वारे पाण्याचा उपयोग केला जातो. तरीही उन्हाळ्य़ाचे दिवस लक्षात घेता पाण्याच्या नासाडीला आवर घालण्याची दक्षता घेतली जाईल. -सुरेश हुंगे, कार्यकारी अभियंता जलप्रदाय विभाग मनपा- 

टॅग्स :WaterपाणीAkolaअकोला