अकोला : आजपासून दहावीची परीक्षा; ३0  हजार ५१५ विद्यार्थी प्रविष्ट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 02:08 AM2018-03-01T02:08:00+5:302018-03-01T02:08:00+5:30

अकोला : माध्यमिक शालांत (इयत्ता १0 वी) ची परीक्षा अमरावती मंडळाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्चपासून प्रारंभ होत आहे. दहावीच्या परीक्षेला जिल्हय़ातून एकूण ३0 हजार ५१५ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, ११९ केंद्रांवर ही परीक्षा होईल.   

Akola: Tenth test from today; 30 thousand 515 students enrolled | अकोला : आजपासून दहावीची परीक्षा; ३0  हजार ५१५ विद्यार्थी प्रविष्ट 

अकोला : आजपासून दहावीची परीक्षा; ३0  हजार ५१५ विद्यार्थी प्रविष्ट 

Next
ठळक मुद्दे११९ परीक्षा केंद्रं

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : माध्यमिक शालांत (इयत्ता १0 वी) ची परीक्षा अमरावती मंडळाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्चपासून प्रारंभ होत आहे. दहावीच्या परीक्षेला जिल्हय़ातून एकूण ३0 हजार ५१५ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, ११९ केंद्रांवर ही परीक्षा होईल.   
अमरावती मंडळामार्फत दहावीची परीक्षा १ ते २४ मार्चदरम्यान होणार आहे. माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने दहावीच्या परीक्षेची संपूर्ण तयारी करण्यात आली. यंदा परीक्षेदरम्यान कॉपी प्रकाराला प्रतिबंध करण्यासाठी विशेष पथके गठित करण्यात आली आहेत.  जिल्हय़ातील उपद्रवी परीक्षा केंद्रांवर शिक्षण विभागाकडून विशेष लक्ष देण्यात येणार आहे. 
शिक्षण विभागाकडून उपद्रवी परीक्षा केंद्रांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यात संत तुकाराम महाराज विद्यालय किनखेड पूर्णा, सरस्वती विद्यालय, पारस, स्व. एच. गव्हाणकर विद्यालय, निमकर्दा, जय बजरंग हायस्कूल, रुस्तमाबाद (आळंदा) आणि महात्मा फुले विद्यालय घुसर या परीक्षा केंद्रांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांंच्या कॉपीला आळा घालण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, महिला अधिकारी पथक, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे पाच भरारी पथके, महसूल विभाग आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांंंचे विशेष भरारी पथक गठित करण्यात आले आहे. 
१ मार्च रोजी सकाळी ११ ते २ वाजेपर्यंंत प्रथम भाषा मराठी, फ्रेंच विषयाचा पहिला पेपर होईल. ३ मार्च रोजी द्वितीय भाषा मराठीचा पेपर होणार आहे. ५ मार्चला द्वितीय भाषा हिंदीचा पेपर सकाळी ११ ते २ वाजेपर्यंंंत आणि हिंदी संयुक्त हा पेपर सकाळी ११ ते १ वाजेपर्यंंंत होईल. 
 

Web Title: Akola: Tenth test from today; 30 thousand 515 students enrolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.