शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : महापालिकेच्या स्थायी समितीत दहा नवीन चेहरे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 02:09 IST

अकोला : महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीला एक वर्षांंंचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर निकषानुसार आठ सदस्य नवृत्त झाले. नवीन आठ सदस्यांची निवड करण्यासाठी बुधवारी मनपाच्या मुख्य सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्थायी समितीमधील काँग्रेसचे सदस्य अँड. इक्बाल सिद्दीकी व राष्ट्रवादीप्रणित लोकशाही आघाडीचे मोहम्मद मुस्तफा यांनी ‘स्थायी’च्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्यामुळे सभागृहात दहा सदस्यांची निवड करण्यात आली. ‘स्थायी’मध्ये जाण्यासाठी सर्वच नगरसेवक इच्छुक असल्यामुळे नगरसेवकांनी आपसात ‘सेटलमेंट’ केल्याचे यानिमित्ताने पहावयास मिळाले. 

ठळक मुद्देकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांचा राजीनामा; नगरसेवकांची ‘सेटलमेंट’

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीला एक वर्षांंंचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर निकषानुसार आठ सदस्य नवृत्त झाले. नवीन आठ सदस्यांची निवड करण्यासाठी बुधवारी मनपाच्या मुख्य सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्थायी समितीमधील काँग्रेसचे सदस्य अँड. इक्बाल सिद्दीकी व राष्ट्रवादीप्रणित लोकशाही आघाडीचे मोहम्मद मुस्तफा यांनी ‘स्थायी’च्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्यामुळे सभागृहात दहा सदस्यांची निवड करण्यात आली. ‘स्थायी’मध्ये जाण्यासाठी सर्वच नगरसेवक इच्छुक असल्यामुळे नगरसेवकांनी आपसात ‘सेटलमेंट’ केल्याचे यानिमित्ताने पहावयास मिळाले. महापालिकेत मार्च २0१७ मध्ये १६ सदस्यीय स्थायी समितीचे गठन करण्यात आले होते. स्थायी समितीला एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार १६ पैकी आठ सदस्यांना नवृत्त करावे लागते. ईश्‍वर चिठ्ठीद्वारे आठ सदस्य नवृत्त झाल्यामुळे नवीन आठ सदस्यांच्या निवडीसाठी बुधवारी मनपात सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचे पीठासीन अधिकारी तथा महापौर विजय अग्रवाल यांनी भाजपचे गटनेता राहुल देशमुख, शिवसेनेचे राजेश मिश्रा, काँग्रेसमधून नगरसेवक इरफान खान व राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित लोकशाही आघाडीच्या गटनेत्या शीतल गायकवाड यांच्याकडून लिफाफे स्वीकारले. सर्व लिफाफे भाजपचे गटनेता राहुल देशमुख यांनी उघडून त्यामधील सदस्यांच्या नावाचे वाचन केले. वाचन करून निवड झालेल्या विविध राजकीय पक्षातील सदस्यांचे सभागृहाने स्वागत केले. यावेळी उपमहापौर वैशाली शेळके, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. 

आठ नव्हे, दहा नगरसेवकांची निवड!स्थायी समितीमधून आठ सदस्यांना ईश्‍वर चिठ्ठीद्वारे नवृत्त व्हावे लागले होते. बुधवारी सभा पार पडण्यापूर्वी काँग्रेसमधील ‘स्थायी’चे सदस्य अँड. इक्बाल सिद्दीकी, लोकशाही आघाडीचे मोहम्मद मुस्तफा यांनी राजीनामा दिला. त्यामुळे सभागृहाने आठ नव्हे, तर दहा नगरसेवकांची निवड प्रक्रिया पूर्ण केली.

सभापतीच्या निवडीकडे लक्षमनपाचे स्थायी समिती सभापती बाळ टाले यांचा एक वर्षाचा कार्यकाळ १ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. जोपर्यंंंत नवीन सभापतीची निवड केली जाणार नाही, तोपर्यंंंत बाळ टाले पदावर कायम राहतील. मात्र, त्यांना सभेचे आयोजन करता येणार नाही. सभापती पदाच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन केले जाईल. या पदावर कोणाची वर्णी लागते, याबाबत भाजपच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.  

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाVijay Agarwalविजय अग्रवाल