शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Akola: पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड; दोन दिवसांत पीकविमा काढणार कसा? हजारो शेतकरी वंचित राहणार

By रवी दामोदर | Updated: July 29, 2023 13:01 IST

Crop Insurance: प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यात हजाराे शेतकऱ्यांना पीक काढायचा राहिला असताना, पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे़ यावर्षी हवामान,पाणी पाऊस प्रतिकुल असल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे़

- रवि दामोदर अकोला - प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यात हजाराे शेतकऱ्यांना पीक काढायचा राहिला असताना, पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे़ यावर्षी हवामान,पाणी पाऊस प्रतिकुल असल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे़ विमा काढायची अंतिंम मुदत ही ३१ जुलै म्हणजेच दाेनच दिवसावर आली आहे़ यामुळे शेतकऱ्यांना सेतू केंद्रावर चकरा मारताना, वेळ,माणसिक त्रास व आर्थिक भूर्दडांचा सामना करावा लागत आहे़ असेच राहिले तर हजाराे शेतकरीपीक विमा काढण्यापासून वंचित राहणार आहेत.

शुक्रवारपर्यंत १ लाख ६८ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून, अशातच पीकविमा पोर्टलमध्ये तांत्रिक अडचण आल्याने शेतकऱ्यांची नोंदणी होत नसल्याचे संपूर्ण राज्यातच चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पीकविमा काढण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पीकविमा पोर्टलमध्ये ऑनलाइन नोंदणी करताना कमीत कमी १ ते १.३० तासांचा कालावधी लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. काहीवेळा संपूर्ण माहिती भरणा होते; परंतु आधार व्हेरिफिकेशन करताना अडचण येत असल्याने अर्ज अस्वीकृत होताे.. गत आठवड्याभरापासून पोर्टलमध्ये ही तांत्रिक अडचण येत असल्याने शेतकरी हैराण झाला आहेत.

सुटीच्या दिवशीही कृषी विभागाची कार्यालये राहणार सुरूयोजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतेही अडचण आल्यास त्यांची अडचण दूर करण्यासाठी दि.२९ व ३० जुलै अशा सुटीच्या दिवशीही कृषी विभागाची कार्यालये सुरू राहणार आहेत.

पीकविम्या योजनेंतर्गत २.७९ लाख हेक्टर संरक्षितआतापर्यंत तब्बल ३.५७ लाख नोंदणी करण्यात आली आहे. त्यामध्ये २ हजार ८२७ कर्जदार व ३ लाख ५४ हजार ८०२ बिगर कर्जदारांचा समावेश आहे. आतापर्यंत २.७९ लाख हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यात आले आहे.

रात्रीही शेतकरी सेतू केंद्रातगत आठवड्याभरात दोनवेळा पोर्टल बंद असल्याचे सांगण्यात आले. सध्या रात्री १२ ते १.३० वाजताच्या सुमारास पोर्टल सुरू असल्याचे सांगण्यात येत असल्याने शेतकरी रात्रीही सेतू केंद्रात पोहोचत आहेत.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAkolaअकोलाFarmerशेतकरी