अकोला: गडचिरोली जिल्हा हॉकी असोसिएशन व आर्यन क्लब आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय हॉकी क्रीडा स्पर्धेकरिता हॉकी अकोला असोसिएशनचा संघ जाहीर करण्यात आला. ४ ते ७ जून या कालावधीत आरमोरी येथे स्पर्धा होणार आहे.संघामध्ये हृषीकेश श्रीवास, शाहरुख खान, राज पवार, आशिष उगवेकर, गौरव दांदळे, सुरज ठाकूर, शुभम निंबाळकर, आकाश जाधव, सत्यम दुबे, अमित तायडे, रोहित दांदळे, मोहित एखंडे आदी खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. संघ व्यवस्थापक म्हणून मयुर चौधरी याची निवड झाली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अभय पाटील, डॉ. संदीप चव्हाण, भूषण साळवे, विजय झटाले, प्रशांत खापरकर, लक्ष्मीकांत उगवेकर, मयुर निंबाळकर, स्वप्नील अंभोरे, अजय कांबळे, मोहम्मद साकीब, दीपिका सोनार आदींनी संघाला यशस्वीतेकरिता शुभेच्छा दिल्या, अशी माहिती सचिव धीरज चव्हाण यांनी दिली.
राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेकरिता अकोला संघ जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 15:32 IST
राज्यस्तरीय हॉकी क्रीडा स्पर्धेकरिता हॉकी अकोला असोसिएशनचा संघ जाहीर करण्यात आला.
राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेकरिता अकोला संघ जाहीर
ठळक मुद्दे ४ ते ७ जून या कालावधीत आरमोरी येथे स्पर्धा होणार आहे.हॉकी क्रीडा स्पर्धेकरिता हॉकी अकोला असोसिएशनचा संघ जाहीर करण्यात आला.